Homeक्राईमलोणावळ्यात सापळा रचून वानवडी पोलिसांची कारवाई; २.५ लाखांचा चोरीचा टेम्पो चोरट्यासह हस्तगत.

लोणावळ्यात सापळा रचून वानवडी पोलिसांची कारवाई; २.५ लाखांचा चोरीचा टेम्पो चोरट्यासह हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. २२/०८/२०२५ रोजी रात्री ०८/०० वा. ते दि. २३/०८/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा. ये सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, अण्णाभाऊ साठे उद्यानसमोर रामटेकडी हडपसर पुणे येथुन फिर्यादी शाहरुख शब्बीर शेख यांचा एकुण २,५०,०००/- रु. कि. चा अशोक लेलॅन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो नं. आर. टी. ओ नंबर M.H. 14 GD 4823 यास लॉक व पार्क केलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी सपोनि महाडिक व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा तपास चालू केला. घटनास्थळापासुन आजुबाजूचे परिसर पासुन चाकण पर्यंत साधारण ३०० ते ३२० सी.सी.टि.व्ही. फुटेज कॅमेरे चेक केले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व दिपक क्षीरसागर यांना मिळालेल्या बातमीवरुन आज दि. २३/११/२०२५ रोजी कैलासनगर, लोणावळा, पुणे ग्रामीण येथे रोडच्या बाजुला टेम्पो थांबलेला आढळुन आला. तेथे रात्रीच्या वेळेस आडबाजुस थांबुन टेम्पोवर लक्ष ठेऊन वानवडीचे तपास पथक सापळा लाऊन थांबले. काही वेळाने एक इसम आला व त्याने तो टेम्पो चालु करुन निघण्याचे तयारीत असताना त्यास स्टाफसह आहे त्या परिस्थतीत आज रोजी ०३.०० वा. ताब्यात घेतले. त्याचे नाव गणेश शंकर पवार, वय-२५ वर्षे, धंदा चालक, रा. कैलासनगर, नवाज शेख यांचेकडे भाडयाने नदीच्या जवळ, लोणावळा जिल्हा पुणे असे सांगितले. त्याचेकडे सखोल तपास करता त्याने सांगितले की, सुमारे तीन महिन्यापुर्वी मी व माझा सहकारी श्रावण वाघमारे रा. लोणावळा रेल्वे स्टेशन परिसर असे आम्ही दोघे फिरत-फिरत हडपसर येथे गेलो होतो, आम्हांस परत येण्यास वाहन नसल्याने आम्ही दोघांनी रामटेकडी येथुन हा टेम्पो चोरी करुन लोणावळा येथे घेऊन आलो व त्याचा भंगार वेचण्यासाठी वापर करीत होतो वगैरे सांगितले. नमुद आरोपीचे ताब्यातून २,५०,०००/- रु. कि.चा एक आयरीश ग्रीन रंगाचा अशोक ले लॅन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो त्याचा आर. टी. ओ नंबर M.H. 14 GD 4823 हा जप्त केला व सदरचा वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी श्रावण वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त सो वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजयकुमार डोके, पोलीस निरीक्षक (गुन्हे). वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे स.पो.नि. उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर या तपास पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!