Homeक्राईमप्रवाशांना रात्रीच्या वेळी जबरी चोरी करुन लुटणारे रिक्षाचालक व विधीसंघर्षीत बालकांकडुन एकुण...

प्रवाशांना रात्रीच्या वेळी जबरी चोरी करुन लुटणारे रिक्षाचालक व विधीसंघर्षीत बालकांकडुन एकुण ३,७०,२००/-रु.कि.चे ३० मोबाईलसह मुद्देमाल जप्त, वानवडी पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे शहरात होणाऱ्या वारंवार मोबाईल चोरीबाबत मा. पोलीस आयुक्त सो., पुणे शहर यांनी त्याबाबत माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणुन त्यांना प्रतिबंध घालणेकामी सुचना व मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी उमाकांत महाडिक, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल गायकवाड व अमोल पिलाणे यांना बातमी मिळाली की, “नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर पासुन आतमध्ये जाणारे कच्च्या रस्त्यावर, हडपसर, पुणे येथे तीन इसम हे त्यांचेकडील रिक्षा क्र. एम एच १२ व्ही बी ९४२० हिचेमध्ये थांबलेले असुन त्यांचेकडे एक मोबाईल हॅन्डसेट आहे तो बिहारी कामगार लोकांना विक्री करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांचेकडील मोबाईल हॅन्डसेट हा चोरीचा असावा.” अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे आदेश व सुचनाप्रमाणे पोलीस हे बातमीच्या ठिकाणी जाऊन थोडे आडबाजुस थांबुन पाहणी केली असता, नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर पासुन आतमध्ये जाणारे कच्च्या रस्त्यावर बातमीतील वर्णनाची रिक्षा थांबलेली असलेली आम्हास दिसुन आली. त्यावेळी योग्य कार्यपध्दतीचा अवलंब करुन नमुद रिक्षामध्ये थांबलेले इसमांजवळ जाताच ते रिक्षा चालु करुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना ताब्यात घेतले. ‘ फैजान मोहम्मद गौस शेख, रा. जामा मज्जीदजवळ, आशियाना बिल्डींग, तिसरा मजला, आदर्श नगर, ऊरुळी देवाची, पुणे व दोन विधीसंघषत बालक हे मिळुन आले. त्यांचेकडे तपास करुन त्याची पाहणी करता त्यांचेकडे एक ग्रे कलरचा विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मिळुन आला. तसेच रिक्षा चेक केली असता सदर रिक्षाचे डिक्कीमध्ये एक चाकु मिळुन आला. त्याबाबत त्यांचेकडे तपास करता, फैजान शेख यांने सांगितले की, दोन महिन्यापुर्वी आम्हां तिघांनाही पैशाची आवश्यकता असल्याने एका बालकाने एम एच १२ व्ही बी ९४२० रिक्षा आणली. या रिक्षामधुन पुणे स्टेशन येथे जावुन तेथे शिवाजीनगर येथे जाणा-या एकट्या प्रवाशाला शिवाजीनगर येथे ५० रुपयांत सोडतो असे सांगुन त्यास रिक्षामध्ये बसवुन टर्फ क्लब रेसकोर्स भैरोबानाला पुणे येथे निर्जन स्थळी घेवुन आलो आणि त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम व इतर असे काढुन घेतले. वगैरे सांगितले. तसेच नमुद आरोपीस वानवडी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. ३०६/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) हा गुन्हयात अटक करुन एकुण ८०, १००/- रु.कि.चा मुद्देमाल त्यामध्ये १ मोबाईल, गुन्हयात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. नमुद आरोपीकडे
केलेल्या तपासात त्याने आणखी मोबाईल हॅन्डसेट चोरी केल्याचे सांगुन एकुण २,९०,१००/- रु.कि.चे एका निळया रंगाची बॅगमधील २९ मोबाईल जप्त करण्यात आले. सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असुन विधीसंघर्षीत बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर ठेवले आहे.
नमुद आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे
१) वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३०६ / २०२५, भारतीयन्याय संहिता ३०९ (४), ३(५) प्रमाणे
२) वानवडी पोलीस ठाणे, गु.र.नं. ४०० / २०२५ बीएनएस ३०९ (४), ३(५)
३) वानवडी पोलीस ठाणे, गु.र.नं. २९०/२०२१, भादंवि कलम ३७९
सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. विजयकुमार डोके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे महीला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!