संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर !
दि. २१/०९/२०२५ रोजी दोन इसम उरुळी कांचन कडुन निगडीकडे जात असुन सदर रिक्षामध्ये मोठयाप्रमाणात गांजा असल्याची गोपनिय बातमी पो. शि. राहुल कर्डीले नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर बातमी प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर यांचे अधिनस्त एक स्वतंत्र पथक तयार करून त्या पथकास सापळा रचुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी रिक्षा येणारे मार्गावर सापळा रचुन संशयीत रिक्षांवर पाळत ठेवली.
दि. २१/०९/२०२५ रोजी सकाळी ०९/१५ वा थे सुमारास ज्ञानेश्वर आदेकर यांचे शेतजमीनीलगत, थेउर रेल्वे पुल सर्व्हिस रोड, थेउर, ता. हवेली, जि. पुणे येथे संशयीत रिक्षा दिसताच लोणी काळभोर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षा चालकास ताब्यात घेतले. सदर रिक्षाची पोलीसांनी तपासणी केली असता रिक्षामध्ये रिक्षाचालक नामे लक्ष्मण राजु पवार, वय ३० वर्षे, रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे याने त्याचा साथीदार रवि आण्णा कु-हाडे, रा. यमुना नगर मनपा हॉस्पीटलच्या मागे, सिध्दार्थनगर झोरडपट्टी, ओटा स्किम निगडी, पुणे त्याचेसह सुमारे २,४०,०००/- रु किं. चा १२ किलो ३४५ ग्रॅम वजनाचा गांजा, विकीकरीता अनाधिकाराने. बेकायदेशिररित्या जवळ बाळगले असताना मिळुन आले. सदर गांजा ते त्यांचे ताब्यातील रिक्षा नं. एम एच १४ एल एस ३१४६ मधुन घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर रिक्षा देखील जप्त करणेत आली आहे. असा एकूण सुमारे ५,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलीसांनी जप्त केला आहे. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस वरिल नमुद दोन इसम व एका अज्ञात इसमाविरुद्ध गु. र. नं. ४२४/२०२५. एन. डी. पि. एस. अॅक्ट ८ (क). २० (ब) (ii)(अ) प्रमाणे गुन्हा नोंदवणेत आला आहे.
लोणी काळभोर पोलीसांना सदर गुन्हयातील आरोपी तसेच रिक्षा नंबर अथवा इतर कोणतीही खात्रीशिर माहिती नसताना देखील त्यांनी अतिशय कौशल्यपूर्णरित्या संशयीत रिक्षा व रिक्षा चालकास ताब्यात घेवून त्याचेकडुन सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे…
सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो.हवा. माने, सातपुते, वणवे, देविकर पोलीस शिपाई राहुल कर्डीले, सोनवणे, दडस, कुमार पाटील, कुदळे, विर, गाडे, शिरगीरे यांनी केली आहे.
अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























