Homeक्राईमयवत पोलीस स्टेशन हददीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर...

यवत पोलीस स्टेशन हददीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण

दिनांक २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) मौजे यवत ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून एक अनोळखी इसम, यय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी अज्ञात ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले आहे. म्हणुन फिर्यादी नामे पो. हवा. विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ५५३ / २०२५ अन्वये दि. २७/०६/२०२५ रोजी कायदेशीर तक्रार दिली होती.
तरी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर वय २४ वर्ष, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव हा सुंदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर, वय २५ वर्षे २) राजश्री योगेश पडळकर, वय २३ वर्ष दोघे रा. माळशिरस ता. पुरंदर जि. पुणे ३) विकास आश्रुबा कोरडे, वय २१ वर्ष रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव ४) शुभम उमेश वाघमोडे, वय २२ वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे वय ४२ वर्ष रा. येवती ता. जि. धाराशिव यांनी संगनमताने कट रचून इसम नामे लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवून जीवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि. ११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्वये सपोनि महेश माने हे करित आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण. मा. श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती. मा. श्री. बापुराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड. यांचे मार्गदर्शनाखाली मा. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. मा. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि राहूल गावडे (स्था. गु. शा), सपोनि महेश माने, सपोनि प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मागेती मेतलवाड, सहा. पो. फौजदार सचिन घाडगे (स्था. गु. शा), पी. हवा. मोमीन शेख (स्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (स्था. गु. शा), पो. हवा. अजय घुले ( स्था. गु. शाखा ), पी. कॉ. धिरज जाधव (स्था. गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापरे, पी. हवा, दत्ता काळे, पी. हवा. महेंद्र चांदणे, पो. हवा. रामदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हवा. गणेश कर्चे, पी. हवा. सुनिल नगरे, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, हवा, परशुराम म्हस्के, पी. हवा. प्रमोद शिंदे, पी. हवा, वैभव भापकर, पो.कॉ. मारुती बाराते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक वेताळ, पी. कॉ. प्रणव ननवरे, पो. कॉ.प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. सचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवसे, म.पी.कॉ. स्वप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!