संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *
हिंजवडी येथे घडलेल्या ‘तो’अग्नीचा तांडव
अपघात नसून चालकाने सूडबुद्धीने केलेला घातपात असल्याचे पोलीस
तपासात निष्पन्न झाले आहे .मात्र या
घटनेमध्ये चार कामगारांचा जागीच
घोरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त
करण्यात येत आहे.
१)शंकर शिंदे २)गुरुदास लोखंडे ३)सुभाष भोसले
आणि ष्)राजेंद्र चव्हाण अशी मृत्युमुखी पडलेल्या
कामगारांची नावे आहेत .ही घटना दुदैवी घटना
बुधवार (ता १९)रोजी सकाळी आठ वाजण्याच्या
सुमारास हिंजवडी येथील फेज १ येथे घडली होती.
या घटनेमध्ये १२ कामगारांना घेऊन जाणान्या एका
टर्हलर्स टेम्पो ने अचानक पेट घेतल्याने ४
कामगारांचा जागीच जागीच होरपळून मृत्यू झाला
होता तर इतर ६ कामगार जखमी झाले.या
धक्कादाय घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते
प्राथमिक तपासामध्ये चालकाच्या पायाजवळ
आग लागल्याने ही दु्टना घडली असावी असा
अंदाज व्यक्त केला जात होता. आगीचे स्वरूप
इतके भयानक होते की आग आत मध्ये झपाट्याने
पसरत गेल्याने आगीने रौद्ररूप धारण केले .बघता
बघता इतकी पसरली की ट्र्हल्स टेम्पोच्या पाठीमागील सीटवर बसलेले ४ कामगार आगीच्या
भक्ष्यस्थानी पडले,तसेच टेम्पो ट्र्हलच्या
पाठीमागील दरवाजा लॉक झाल्याने त्यांना बाहेर
पडता आले नाही .आणि त्यांचा जागीच होरपळून
मृत्यू झाला ही आग नेमकी कशामुळे लागली
असावी याबाबत पोलीस तपात तपास करीत
असताना काही महत्त्वाच्या बाबी पोलिसांच्या
निदर्शनास आल्या:सीसीटीव्ही फुटेज तपासून
त्यांनी या घटनेचा सखोल तपासून केला असता हा
अपघात नसल्याचे दिसून आले
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी ेम्पो
चालक जनार्दन हंबर्डीकर यांच्याकडे कौशल्य पूर्व
तपास केला असता ,धक्कादायक माहिती समोर
आली या चालकानेच सूडबुदधीने टेम्पोट्रॅरहल्स ला
आग लावली असल्याची माहिती मिळाली,
माझा दिवाळीतील पगार कापला होता ,याशिवाय
गाडीतील सर्व कर्मचारी मला त्रास देत होते त्यामुळे
मी ज्वलनशील केमिकल आणून अगोदरच सीट
खाली टाकून ठेवले होते नंतर फेज १ येथे संधी
मिळताच मी काडी पेठ्रून आग लावली;परंु भडका
पेटण्यापूर्वी मी खाली उडी मारली होती अशी
कबुली चालक जनार्दन हंबरडीकर यांनी
पोलिसांना दिली .त्यामध्ये चालक जनार्दन
हंबर्डेीकर याचे पाय देखील भाजले आहेत
पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
केला आहे पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























