Homeक्राईमसुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१ ची कारवाई.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी पुणे शहरातील सुर्यकांत उर्फ बंडु राणोजी आंदेकर, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे यांचे टोळीतील सक्रिय व असक्रिय सदस्य आणखीन गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असून फरारी, पाहिजे आरोपीत ह्यांचा रोजच्या रोज शोध घेवून ते मिळुन येताच त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी तसेच ते मिळुन न आल्यास त्यांचा शोध घ्यावा. त्यांचेवर कडी निगराणी ठेवावी. त्यांचेकडून कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच ते कोणताही गुन्हा करणार नाहीत याबाबत माहिती काढून कार्यवाही करावी असे गुन्हे शाखेला विशेष मोहिम पथक स्थापन करुन आदेश देण्यात आले होते.

मा. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विश्वजीत काईंगडे तसेच मा. पोलीस निरीक्षक, श्रीमती अश्विनी जगताप, युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे तसेच सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत, समर्थ पो.स्टे., तसेच पोलीस अंमलदार असे दिनांक १०/०६/२०२६ रोजी पेट्रोलिंग करित असताना पोलीस अंमलदार अमोल आवाड यांना त्यांच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम स्वतःचे ताब्यात देशी बनावटीचे पिस्तुल कंबरेला लावुन नांदेड सिटी चुल आंगण हॉटेलचे परिसरात फिरत आहे. मिळालेली बातमी पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, खंडणी विरोधी पथक १ व पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असता, सर्व स्टाफसह नमुद ठिकाणी जावून आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे, वय २७ वर्षे, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, विंग नं.ए ७, नांदेडसिटी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेला पॅन्ट मध्ये खोचून ठेवलेले एक सिल्व्हर रंगाचे धातूचे तसेच प्लॅस्टीकच्या काळ्या रंगाची मुठ असलेले पिस्तुल व त्याचे मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर पिस्तुलाचे परवानाबाबत त्यास विचारणा केली असता त्याने त्याचेकडे याचा परवाना नाही असे सांगितले. त्याचेकडे मिळून आलेल्या पिस्टल बाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदर पिस्तुल त्याचा मित्र याचेकडुन घेतले आहे असे सांगितले. नमुद आरोपीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समर्थ पो.स्टे. ०३, बंडगार्डन पो.स्टे., ०१, फरासखाना पो.स्टे., ०१ तसेच चॅप्टर केस, मोक्का व तडीपार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विश्वजीत काईगडे, गुन्हे शाखा, युनिट २ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, सहा पोलीस निरी राजेश माळेगावे तसेच सहा पोलीस निरी. धिरज राऊत, समर्थ पो.स्टे., पोलीस अंमलदार फडतरे, आवाड, दांगडे, कांबळे, इम्रान शेख, जगताप, यादव यांनी कार्यवाही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!