Homeक्राईमवाहनचोरी प्रकरणी वानवडी पोलिसांचा सापळा; २ विधिसंघर्षीत बालक ताब्यात, ३ दुचाकी हस्तगत.

वाहनचोरी प्रकरणी वानवडी पोलिसांचा सापळा; २ विधिसंघर्षीत बालक ताब्यात, ३ दुचाकी हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक : – 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिं.२६/०१/२०२६ रोजी वानवडी पोलीस ठाणेचे तपासपथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार. कांबळे व पोलीस अंमलदार वाघमारे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया बुधानी वेफर्स कंपनीचे समोरील मोकळया जागेत, रामटेकडी, हडपसर, पुणे येथे दोन तरुण इसम हे त्यांचेकडील अॅक्टीवा गाड्यांवर संशयास्पदरित्या थांबलेले असुन त्या गाड्या विक्री करण्याचा ते प्रयत्न करित आहेत तसेच त्या गाड्या त्यांनी चोरी केलेल्या असाव्यात.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाती अधिकारी व अंमलदार यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक सो यांचे आदेशाने बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाचे दोन इसमांना पकडुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडे असणा-या एक निळया रंगाचे ॲक्टीवा गाडी क्र. एम.एच.१२ / व्ही.एन.८०३५ व एक काळया रंगाची अॅक्टीवा गाडी क्र. एम. एच. १२ / वाय. व्ही. ५१४६ या त्यांनी वानवडी परिसरातुन चोरी केल्याचे सांगीतले. तसेच त्यांनी वानवडी परिसरातुन आणखी एक पांढरे रंगाची अॅक्टीवा गाडी क्र. एम एच ११ डी डब्ल्यु ८८२४ ही चोरली होती परंतु ती गाडी पोलीसांची असल्याचे समजल्याने त्यांनी ती गाडी पुन्हा फिर्यादी यांचे राहते घराचे परिसरात नेवुन पार्क केली होती. असे सांगीतले तसेच त्यांचेकडे तपासादरम्यान ते अल्पवयीन असल्याने ते विधिसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. बालकांनी मिळुन वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये ०३ वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत.
१. वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३९९/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे २. वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४८२ / २०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे ३. वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४१९ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
सदरची कामगिरी ही पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती संगीता जाधव, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, आबासाहेब वाकसे, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!