संपादक फिरोज खाटीक:- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
रमजान ईद दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास, एक इसम त्याचे आर वन फाईव्ह या गाडीवरती आम्ही बंदोबस्त मध्ये असताना,आम्हास कट मारून जोरात निघून गेल्याने, तात्काळ त्या दिशेला असणाऱ्या मार्शल ला अवगत केले असता, Pc/7790 पवार व Pc 3785 गजेवाड यांनी. त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांना पकडले व त्यांची झडती घेतली असता, त्यापैकी इसम नामे प्रकाश दीपक नवगिरे वय २३ वर्ष काम ड्रायव्हर रा. सरगम चाळ बिबवेवाडी पुणे. याचे कमरेला एक लोखंडी धारदार शस्त्र मिळाल्याने, तात्काळ त्यास सदर गाडीसह ताब्यात घेऊन, तसा ईसाक्ष पंचनामा करून , आरोपींना पुढील कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले असून, त्याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७०/२५ आर्म ऍक्ट ४.२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























