Homeक्राईममारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

मारहाण करून मोबाईल, पैसे व रिक्षा लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्रौ ०३/३० वा. चे सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटल समोर, बिबवेवाडी पुणे येथून फिर्यादी नामे सिध्देश्वर नरहरी मुंढे, वय १९ वर्षे, रा. सर्वे नं. ६६/६/९, वृंदावनी कॉलनी, गल्ली नं. ०३, आंबेगाव बु. पुणे त्यांचे रिक्षामधून जात असताना दोन पांढरे रंगाचे मोपेड गाडीवरून आलेल्या ०४ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांची रिक्षा अडवून त्यांना जबरदस्तीने बाहेर ओढून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचे खिशातील विवो कंपनीचा मोबाईल रोख रक्कम व रिक्षा जबरदस्तीने घेवून पळून गेल्याने फिर्यादी यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), १२६(२), ३(५), महाराष्ट पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिनुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) किरण एडबा झोंबाडे, वय २० वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मी नगर, पर्वती पुणे, २) पंकज सुभाष पवार, वय २१ वर्षे, रा. शाहू वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मी नगर, पर्वती पुणे, ३) कुमार बाळकृष्ण खुडे, वय ३० वर्षे, रा. जागडे चाळ, गॅस गोडावून जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे यांना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व नियोजनाप्रमाणे गंगाधाम रोड, आईमाता मंदिर मागे, बिबवेवाडी पुणे येथून अत्यंत चतुराईने ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबूल केले. वर नमुद आरोपीतांना दाखल गुन्ह्याचे अटक करून त्यांचेकडून दाखल गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करून दोन पंचासमक्ष जप्त करणेत आले आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपीतांची मा. न्यायालयाचे आदेशाने येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त मिलींद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, सहा. पोलीस फौजदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहूल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!