Homeक्राईमभारतीय सैन्य दलातील जवान यांचे कमांड हॉस्पीटल परिसरातील शासकिय निवासस्थानातुन घरफोडी करुन...

भारतीय सैन्य दलातील जवान यांचे कमांड हॉस्पीटल परिसरातील शासकिय निवासस्थानातुन घरफोडी करुन चोरी केलेले लाखोचे सोने व ऐवज जप्त, सैन्य दलातील भगोडा शिपाईच निघाला चोर वानवडी पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स !ऑनलाईन पुणे *

वानवडी पोलीस सटेशन पुणे शहर

दिनांक ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी नामे दनाजयाँ वादिवेल्लु वय – ३५ वर्षे सैन्य दलातील हवालदार, रा. पी-२९/३ पहिला मजला, मॅरिड वसाहत, ए.आय.सी.टी.एस, वानवडी पुणे यांचे याचे राहते घरी. पी-२९/३ पहिला मजला, मॅरिड वसाहत, ए. आय. सी. टी. वानवडी पुणे येथे अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटाचे लॉकमध्ये ठेवलेले १३,००,०००/रु.कि.चे एकुण साधारण २१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १०० ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने हे घरफोडी करून चोरुन नेले आहे. म्हणुन अज्ञात चोरट्या विरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १०७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ ( ४ ), ३०५ गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथक यांचेकडे दिला असता, तपास पथकाने वानवडी कॅन्टोमेंट, कोंढवा, गोळीबार मैदान, स्वारगेट, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, पुणे स्टेशन, विमाननगर इत्यादी ठिकाणाचे साधारण २० कि.मी. अंतरावरील १२० पेक्षा सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले असता त्यामध्ये संशयित इसम मिळुन आला. तसेच संशयित इसम हा पुणे स्टेशनजवळील शेठ मोरारजी गोकुळदास सॅनेटोरियम आणि धर्मशाळा या लॉजवर थांबलेला निष्पन्न झाले व तेथे त्याने सादर केलेले आधारकार्डवरुन मोबाईल नंबर मिळाला.
नमुद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करता आरोपीचे नाव अमरजित विनोदकुमार शर्मा, रा. हमिरपुर, राज्य हिमाचल प्रदेश असल्याची माहिती प्राप्त होऊन तो गुन्हयाचे घटनास्थळी हजर असल्याचे निष्पन्न झाले. नमुद संशयित इसम हा बंगलोर येथे असल्याचे माहिती पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विष्णु सुतार यांना मिळाली. त्याद्वारे वरिष्ठांची परवागनी घेऊन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे, पो. अंम. अमोल गायकवाड, विष्णु सुतार व यतीन भोसले असे तात्काळ रवाना झाले. नमुद टिम बंगलोर येथे पोहचली असता संशयित आरोपीचे लोकेशन हे कोल्हापुरच्या दिशेने जात असल्याचे मिळाले त्याप्रमाणे नमुद लोकेशनप्रमाणे आरोपीचा पाठलाग करुन त्यास खंडाळा, सातारा येथे ताब्यात घेतले, त्याचे नाव अमरजित बिनोदकुमार शर्मा, वय – ३० वर्षे, धंदा -नोकरी (भारतीय सशस्त्र सेना थल सेना, शिपाई) रा. गाव बघेड, पो. मंगनोटी, ता. बडसर, बघेड, जि. हमीरपुर, राज्य हिमाचल प्रदेश असे असल्याचे माहिती मिळाली.
नमुद इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडतीत एकूण कि.रु. २३,६००/- रु. चा मुद्येमाल त्यामध्ये शगबॅग, ४ मोबाईल हॅन्डसेट, १ पॅड, पॅन्ट-शर्ट, आर्मीचे कार्ड, आधारकार्ड व स्टीलची कटावणी असे असा मुद्देमाल मिळाला व त्याचेकडे तपास करता तो, त्यास ऑनलाईन जुगारामध्ये लाखोचे नुकसान झाले होते, म्हणुन त्याचे मानसिकत्रास खाली जोधपुर, राज्यस्थान येथुन नोकरीवरुन पळुन अहमदनगर येथे आर्मी हेडक्वॉटर येथे जात असताना त्यास पैशाची गरज असल्याने त्याने त्याचे आर्मीचे कार्ड वापरुन वानवडी आर्मी परिसर येथे सहज प्रवेश मिळविला व तेथे फिरत असताना आर्मी क्वॉटर्समध्ये चोरी केल्याचे कबुली दिली. म्हणुन नमुद इसमाचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली व त्याबाबत त्याचे लेफ्नंट कर्नल सोो, सेकंड – इन- कमांड, ५८ आर्मर्ड रेजिमेंट भारतीय सशस्त्र सेनाएँ – थल सेना आहिल्यानगर (अहमदनगर), महाराष्ट्र यांना कळविण्यात आले.

नमुद अटक आरोपीकडे तपास करता त्याने गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने हे हडपसर येथे करण सत्यप्रकाश डागर, वय- २८ वर्षे, धंदा – व्यवसाय, रा. बी.टी. कवडे रोड, नवीन ब्रिजजवळ, घोरपडी, पुणे यास विक्री केल्याचे सांगुन नमुद रिसीव्हर आरोपीस अटक करुन त्याचेकडुन ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच नमुद आरोपी हिमाचल येथे घरी जात असताना दिल्ली येथे सोनाराकडे जाऊन त्याने त्याचे भारतीय आर्मीचे ओळखपत्र दाखवुन मी, आर्मी वाला असुन मला पैशाची गरज आहे असे सांगुन तेथील सोनारांना खोटे सांगुन सोने गहाण ठेऊन पैसे घेऊन गेला. त्याप्रमाणे तपास पथक, आरोपीसह दिल्ली येथे जाऊन नमुद सोनाराकडे तपास करता त्यांना चोरीचे दागिने असल्याचे माहिती झाल्याने त्यांनी ते ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हजर केल्याने गुन्हयाचे तपासकामी जप्त केले आहे. अशा प्रकारे अटक आरोपीतांकडुन एकुण १३,७७,०००/-रु.कि.चा एकुण १६२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल व इतर साधने जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीतांची एकुण ०७ पोलीस कस्टडीचे रिमांड असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोण हे करीत आहे.

सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. सत्यजित आदमाने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक व गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे या विशेष पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई | खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपी...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बिबवेवाडीतील स्पा सेंटरवर छापा, २ पीडित मुलींची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :-9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *   ! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक १६/०५/२०२६...

क्रिप्टो करंन्सीच्या बहाण्याने जबरी चोरी ; विमानतळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक ११/०५/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन यातील...

स्पा चालकाला वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत १.५ लाखांची खंडणी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस स्टेशन हददीत दि. १३/०५/२०२६ रोजी...

चंदननगर पोलिसांची वेगवान तपासमोहीम ; घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेले घरफोडीचे...

error: Content is protected !!