Homeक्राईमभाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणाऱ्या घरमालकांविरोधात लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हे...

भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणाऱ्या घरमालकांविरोधात लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) प्रमाणे घरमालक यांनी भाडेकरू ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असले बाबत आदेश काढलेले असुन त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमाव्दारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरुं बाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन पथके निर्माण करण्यात आली होती. भाडेकरुची माहिती घेणारे पथकास तीन घरमालक यांनी भाडेकरु ठेवल्यानंतरही त्याची माहिती पोलीसांना कळविली नसले बाबत माहिती प्राप्त झाल्याने सदर पथकाने १) दिलीप एैजिनाथ तकीक, वय-३३, रा. सुतारपट्टी, गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, हवेली, पुणे. २) सरोजा प्रताप जाधव, वय – ४९ वर्षे, रा. लेन नं. ०४, गणराज पार्क, कवडीपाट, कदमवाक वस्ती, हवेली,पुणे. ३) शिवाजी सुदाम कांबळे, वय ६० वर्षे, रा. स्वामी विवेकानंदनगर राधाई मच्छि मार्केट जवळ, कदमवाकवस्ती, पुणे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना कळविली नसल्या बाबत सांगीतले आहे. त्यावरुन त्यांचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असुन तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर, हवा. रवि आहेर, पोलीस हवा. रामदास मेमाणे, पोलीस हवा. प्रदिप क्षिरसागर, पोलीस हवा. पोलीस केतन धेंडे, महिला पोलीस हवा. राणी खामकर पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, पोलीस अंमलदार अक्षय कटके यांचे पथकाने केली आहे.
लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या घरमालकांनी भाडेकरु ठेवलेले आहेत. त्यांनी भाडेकरूंची माहिती तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३(३) प्रमाणे पोलीसांना देणे बंधनकारक असल्याने सदरची माहिती सादर करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!