Homeक्राईमफुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई! वाहनचोरी उघड, चार दुचाकींसह  एकुण २,८०,०००/- रुपये किंमतीचे...

फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई! वाहनचोरी उघड, चार दुचाकींसह  एकुण २,८०,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०५/०९/२०२५ रोजी रात्रौ २२/०० वा. चे सुमारास श्री रामा लक्ष्मण भोसले, रा. भोसले वस्ती, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे यांनी त्यांची होंडा कंपनीची ड्रिम युगा मॉडेल असलेली दुचाकी ग्रे रंगाची तिचा आर टी ओ क्र. एम एच १२ के यु ३६८४ त्यांचे राहते पार्कंगमध्ये पार्क करून लॉक करून ठेवली होती. त्यानंतर दि.०६/०९/२०२५ रोजी सकाळी ०७/०० वा. चे सुमारास फिर्यादी परत त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी गाडी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरामध्ये शोध घेतला असून दुचाकी मिळून आली नसल्याने अज्ञात चोरटयाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पो.स्टे. गु.र.नं. २९३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि.०७/०९/२०२५ रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाकडून गुन्हयातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच अज्ञात चोरटयाचा तपास करण्यात येत होता. दि. १०/१०/२०२५ रोजी रात्रौ ०१/३० वा.चे सुमारास तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार रात्रगस्त करत असताना स्वराज मंगल कार्यालय, ऊरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथे पथकास संशयीत एक इसम होंडा ड्रिम युगा दुचाकी वाहनासह संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलीस पथकास संशय आल्याने त्याचेकडे येथे येण्याचे कारण व त्याचेकडे असलेल्या दुचाकीबाबत तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देवून माहिती दिली नाही. संशयीताकडे मिळून आलेल्या दुचाकीचे नंबर वरून पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीची माहिती घेतली असता ती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेवून आणखी सखोल तपास केला असता त्याने आणखी तीन दुचाकी मोटारसायकल चोरी केली असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे दुचाकी वाहने पंचनाम्याने ताब्यात घेण्यात आली असून सदर दुचाकी वाहनाबाबत अभिलेखावरून माहिती घेतली असता १) खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ३७१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे दि. १६/०७/२०२५ रोजीचे गुन्हयातील बुलेट मोटारसायकल, २) लोणंद पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथे गु.र.नं. १६७/२०२५ दि.०१/०५/२०२५ रोजी प्रमाणे दाखल गुन्हयातील होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल, ३) कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. २६५ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २९/०९/२०२५ रोजी दाखल गुन्हयातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले आहेत. अटक आरोपीकडून फुरसुंगी पोलीस स्टेशन, कोथरुड पो.स्टे. पुणे, खडक पो.स्टे. पुणे व लोणंद पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा असे एकुण चार गुन्हे उघडकीस आले असून त्याने चोरी केलेली एकुण २,८०,०००/- रुपये किंमतीची चार दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

अटक आरोपीचे नाव – वैभव अशोक पिंगळे, वय २२ वर्षे, धंदा काही नाही, रा. खंडोबाची वाडी, सोमेश्वर, ता.बारामती, जि. पुणे

वरील कामगिरी मा.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परि.-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर व राजेश खांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोउनि विष्णू देशमुख, पोलीस हवालदार हरिदास कदम, नितीन गायकवाड, सागर वणवे, हनुमंत कांबळे, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, पोमण सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर यांनी प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!