संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे :– सायबर पोलीस ठाणे येथिल फिर्यादी यांना एक अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन येऊन त्यांना मुंबई क्राईम ब्रांचचे संताजी घोरपडे, फायनान्स डिपार्टमेंटचे हेड जॉर्ज मॅथ्यु असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यांना व्हॉट्सअप व्हीडीओ कॉल करुन फिर्यादीचे नावे असलेले बँक एस. बी. आय व एचडीएफसी बँक अकाऊंट यावर जमा असलेली रकम ही मनी लाँड्रीगची असल्याचे सांगुन त्याचेवर मनी लॉन्ड्रींगची केस झाल्याचे सांगुन त्यामध्ये एम टिम अटक करण्यासाठी निघालेली आहे. सदर रक्कम आर. बी. आय फायनन्स कडुन पडताळणी करण्याचे बहाण्याने मनी लॉड्रींग व त्यामध्ये अटकेची भिती घालुन फिर्यादी यांना वेगेवेगळया बँक खात्यामध्ये एकुण ५२,५९,०००/- रुपये पाठविण्यास भाग पाडुन फिर्यादी यांची फसवणुक केल्याने फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ०२५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, २०५, ३०८, ३१६ (२), ३१८ (४), ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६-सी, ६६-डी अन्वये दिनांक ०७/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयात पोलीसांच्याच नावाचा वापर केला असल्याने मा. पोलीस आयुक्त व मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, यांनी दाखल गुन्हयातील आरोपीचा तात्काळ तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेऊन अटक करण्याचे आदेशित केले होते. दाखल गुन्हयातील ५,३९,८४०/- रुपये हे अॅक्सीस बँकेच्या अकाऊंटवर ट्रान्सपर झाले होते. त्यानंतर अॅक्सीस बँकेकडुन सदर अकाऊंट धारकाची माहीती घेतली असता तो आहील्यानगर येथिल असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्यावरुन पोनि रविकिरण नाळे यांनी सपोनि प्रविण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांचे दोन पथक तयार तयार करण्यात आले होते. त्यानंतर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथक यांना सदर अकाऊंट धारकाचा आहील्यानगर येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाव्दोर शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश बाबासाहेब पठारे वय २८ वर्ष, रा. बोल्हेगाव आहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा अविनाश तुंगार, शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा उर्फ जितु भगत याचेसह केला असुन ते तीघेही बोल्हेगाव आहिल्यानगर येथिलच असल्याचे सांगीतले. परंतु आकाश पठारे यास ताब्यात घेतल्यानंतर अविनाश तुंगार, शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा भगत यांनी त्याचा फोन बंद केला होता. त्यानंतर तेथिल स्थानिक संपर्काव्दारे आरोपीचा शोध घेतला असता अविनाश तुंगार हा गाव सोडुन पळुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर तेथिल स्थानिक रस्त्यावर सापळा रचुन अविनाश तुंगार यास ताब्यात घेण्यात आले आहे.
दाखल गुन्हयात आकाश बाबासाहेब पठारे रा. बोल्हेगाव, आहिल्यानगर व अविनाश श्रीकांत तुंगार रा. बोल्हेगाव, आहिल्यानगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा अधिक तपास पो.नि रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे, हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे – पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे – सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार, अतुल लोखंडे, हेमंत खरात, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्निल खणसे, महेश मोटकर, ज्योती साळे, वैशाली बर्गे, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
काय असते डिजीटल अरेस्ट व्यक्तींना एखादया अनोळखी नंबरवरुन पोलीस, न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड, व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करुन त्यांच्या नावानी मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याची सांगुन त्यांना भिती घातली जाते. तसेच आरोपी हे व्यक्तींना व्हिडीओ कॉलव्दारे सुध्दा संबधीत व्यक्ती हे तेच असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे व्यक्तींना त्यांच्यावर विश्वास बसते. त्यानंतर आरोपी हे व्यक्तींना त्यांच्या अकाऊंटवर असलेले सर्व पैसे त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर ट्रान्सपर करण्यासाठी सांगुन फसवणुक केली जाते.
जनतेला आवहान – पोलीस, न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड, व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळया नावांनी संपर्ककरुन मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगुन पैसे ट्रान्सपर करण्यास सांगत असतील तर जवळच्या सायबर पोलीस ठाणे शी संपर्क करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दया किंवा १९३० या टोल फ्रि नबरवर तक्रार दयावी.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























