संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी माननीय पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार तसेच मा. सह पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यांवर ट्रिपल सीट दुचाकी वाहनांवर विशेष मोहीम राबवली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक तसेच वाहतूक दाटीच्या ठिकाणी व्यापक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत एकूण १४५४ ट्रिपल सीट दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २१४४ चलन पेड करून घेण्यात आली आहेत. या माध्यमातून ₹१६,१८,४००/- (सोळा लाख अ
ठरा हजार चारशे रुपये) इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे. याशिवाय एकूण ५९२१ चलन कारवाया करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेमध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील ३० वाहतूक विभाग तसेच ४४ पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
🚨 नागरिकांसाठी वाहतूक पोलिसांचे आवाहन 🚨
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
▪ दुचाकी वाहनावर ट्रिपल सीटने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
▪ ट्रिपल सीटमुळे अपघात होण्याची शक्यता वाढून स्वतःसह इतर रस्ते वापरकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
▪ नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना करावी.
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























