Homeक्राईमपुणे : घरफोडी प्रकरणातील आरोपींना बाणेर पोलिसांची शिताफीने अटक.

पुणे : घरफोडी प्रकरणातील आरोपींना बाणेर पोलिसांची शिताफीने अटक.

मुख्य संपादक :-  इमरान शेख : 9270161610

 संपादक :- फिरोज खाटीक : 9284524906

! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.१६/०४/२०२६ रोजी अंदाजे ०४.३० वा.चे सुमा कोणीतरी अज्ञात इसमांनी फॉच्युन हाऊस, रामइंदु पार्क, बाणेर रोड, पुणे येथील चितळे बंधु व काका हलवाई या दुकानाचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटुन आत प्रवेश करुन लॉकरमध्ये ठेवलेले ६६,०००/- रु. सोने व चांदीचे ऐवज व रोख रक्कम चोरुन नेलेबाबत बाणेर पोलीस स्टेशन गु.र.नं.११०/२०२६ भा.न्या.सं.क ३०५ (अ), ३३१ (४), ३२४(४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्ह्याचे अनुषंगाने अज्ञात आरोपीतांचा बाणेर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कसोशिने घटनास्थळावर मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, न-हे, आंबेगाव परिसरातील तब्बल २२५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपी निष्पन्न केले. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर खुन, खुनाचा प्रयत्न तसेच चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे त्यांचे अस्तित्व लपवुन वेळोवेळी त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असताना पोलीसांनी विशेष कौशल्य वापरुन आरोपींचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे १) शिवम दत्ता अवचार, वय १९ वर्षे रा. फ्लॅटनं ०८, कामठे कॉलनी, अभिनव कॉलेज, न-हे पुणे २) करण शिवाजी जमादार, वय १९ वर्षे, रा. पॅरामोल कॅफेच्या शेजारी, सिंहगड कॉलेज जवळ वडगांव बु, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडुन १) होंडा शाईन कंपनीची गाडी व भगव्या पांढऱ्या रंगाची KTM २०० DUKE कंपनीची दुचाकी २) एक आयफोन १६ ३) २ लोखंडी पालघन ४) १२०००/- रुपये रोख ५) पिवळ्या धातुचा सिक्का त्यावर एका बाजुला कुबेर देवता असलेला असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक गणेश रायकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, श्री. चिलूमुला रजनीकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय खिल्लारे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, शरद राऊत, गजानन अवातिरक, स्वप्निल मराठे, गणेश भोईने, समीर पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर ! मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे...

मौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपुर चाळ या भागात सायकल चोरीच्या...

मोकामधील फरार घायवळ टोळीचा आरोपी सचिन घायवळ राजस्थानमधून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-०३ची मोठी कामगिरी.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट ०३ गुन्हे शाखा, पुणे शहर ! कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं.क...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार आरोपींसह ३ जणांना अटक, २ गावठी पिस्टल व...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर  ! मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे...

कोंढवा बु. येवलेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी दारू विक्रेत्यास MPDA अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध.

0
मुख्य संपादक : इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे...

error: Content is protected !!