Homeक्राईमनिवडणूक काळात कोंढवा पोलिसांचा धडक छापा, १ कोटींची रोकड व दारू जप्त.

निवडणूक काळात कोंढवा पोलिसांचा धडक छापा, १ कोटींची रोकड व दारू जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा  पोलीस स्टेशन पुणे शहर !

निवडणुक अनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्तकरीत असताना पोलीस अंमलदार अमोल हिरवे व केशव हिरवे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तुळजा भवानी निवास, काकडे वस्ती, गल्ली नं ०२, चर्चचे समोर, कोंढवा बु., पुणे येथे अनोळखी दोन इसम व एक महिला हे कोणताही परवाना नसताना अनाधिकाराने त्यांचे राहते घरात त्यांचे ओळखीच्या लोकांना गावठी हातभट्टीची दारू, देशी दारू तसेच विदेशी दारूची विक्री करीत आहे, अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे घरामध्ये लपवून ठेवलेली खालील प्रमाणे अवैधदारू मिळुन आली.
१) १,६००/- रू. किं.ची ४ लिटर गावठी हातभट्टीची दारू.
२) ६,१६०/- रू. किं.ची टॅगोपंच देशीदारूच्या ७७ बाटल्या (सर्व बाटल्या १८० मिली.)
३) १,७५,७४०/-रू. किं च्या त्यामध्य इंपिरिअल ब्लू व्हिस्की १८३ बाटल्या, क्लासिकगोल्ड व्हिस्की ३२ बाटल्या, व्हल्कन ब्लू व्हिस्कीच्या ३८ बाटल्या, मॅकडॉलनं. १ व्हिस्कीच्या २२० बाटल्या, डर्बी स्पेशल व्हिस्कीच्या ४३ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २२४ बाटल्या, ओल्ड मंक रम ४८ बाटल्या (सर्व बाटल्या १८० मिली.), रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ९० मिलीच्या २० बाटल्या,
४) २८,०००/- रू. किं. च्या ३५ लीटरचे दोन हत्ती नग त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू.,
५) दारू विक्रीतून मिळालेली रोख रक्कम १,४१,०५०/- रू. असा एकुण ३,५२,५५०/- रू. किं.चा माल मिळुन आल्याने तो जप्त करून नमूद आरोपी विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.१००३/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद आरोपीतांकडे अधिक तपास करत असताना सदर ठिकाणी असलेले कपाट उघडण्यास सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली असता संशय आल्याने मा. वरिष्ठांनी निवडणुक अधिकारी यांना सदरबाबत कळविले व सदर ठिकाणी पाचारण होण्यास सांगितले. त्यानुसार सदर एफ.एस.टी. मधिल शासकीय अंमलदार यांना पंच म्हणून घेवून त्यांच्या समक्ष कपाटाचे तपासणी केली असता त्यामध्ये ९९,४४,९००/-रू. रोख रक्कम मिळुन आली. तसेच अवैध दारू विक्रीतून मिळालेली १,४१,०५०/- रू. रोख रक्कम, अशी एकुण १,००,८५,९५०/- रू. रोख रक्कम व ३,५२,५५०/- रू. किंमतीचा प्रोव्हि माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अफरोज पठाण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे शहर, श्रीमती. राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्रीमती. नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर, कडील मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. नवनाथ जगताप याचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक (तपास पथक), अफरोज पठाण, पोलीस उप निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, अमोल हिरवे, गोरख चिनके सुभाष जरांडे, केशव हिरवे, रशिद शेख, स्वागत पळसे, पुष्पेंद्र चव्हाण, रियाज पटेल, राहुल रासगे, समीर आवळे, राहुल थोरात, निलेश कामथे, अमित सुर्यवंशी, अयोध्या चेचर व अंजली मोरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!