Homeक्राईमतीन महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणाऱ्या रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीच्या वानवडी...

तीन महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणाऱ्या रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीच्या वानवडी पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर येथे जावुन आवळल्या मुसक्या.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि. ०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा सुमारास फिर्यादी नामे काकासाहेब रामचंद्र शिरोळे हे डी विंग एसआरए बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर, पुणे येथे त्यांचे रिक्षामध्ये नातेवाईकांची वाट बघत थांबुन, त्यांनी त्यांचे रिक्षामधील टेप चालु ठेवुन गाणी ऐकत बसलेले असताना त्यांना मुख्य आरोपी नामे ऋषीकेष सुनील बागुल व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगीतले असता, फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने नमुद आरोपीतांनी फिर्यादीस लोखंडी कोयते, लाकडी दांडके इत्यादींनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले होते, त्यावरुन वानवडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिलेवरुन नमुद आरोपीतांविरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. – २७३ / २०२५ कलम- भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८ (२), १८९(२), १९१ (१), १९१ (२), १९१ (३),१९०,३५१, (२) (३), ३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम- ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील इतर आरोपी अटक केले असुन यातील मुख्य आरोपी हा गुन्हा झालेपासुन फरार होता.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचंनाप्रमाणे त्याचेबाबत तपासपथक प्रभारी अधिकारी व अंमलदार हे नमुद पाहिजे आरोपीबाबत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “ सुमारे तीन महिन्यापुर्वी काकासाहेब शिरोळे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर मारहाण करुन फरार झालेला आरोपी ऋषीकेष सुनील बागुल हा सध्या वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःचे अस्तीत्व लपवुन वावरत आहे. वगैरे बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने व परवानगीने लागलीच तपास पथक प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व स्टाफ असे वैजापुर, छत्रपती संभाजी नगर येथे जाऊन शोध घेता, तो वैजापुर बस डेपो येथे दिसुन आला, त्यावेळी तो पावसाचा फायदा घेऊन पळुन जात असताना पोलीसांनी सापळा रचुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव ऋषीकेश सुनील बागुल, वय- २७ वर्षे, रा. एस. आर. ए. बिल्डींग, डी. विंग, प्लॅट नं. १००५, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे व मु.पो. वैजापुर, आंबेडकरनगर, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजी नगर असे सांगितले. त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन नमुद गंभीर गुन्हयात अटक केली आहे.

तसेच ऋषीकेश सुनील बागुल रा. एसआरए बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यावर दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे

१) खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं. १६८/२०२४ भादवि कलम ४८३.४३९,३०७, ३२४, ५०६, ३४, ३ (२५) २) शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३१८ / २०१९ मुंबई पोलीस अॅक्ट ३७ (१), १३५

३) फरासखाना पो.स्टे. गु.र.न. १६८ / २०२४ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९,४२७,३७(१),(३),१३५,४ (२५),४,७ ४) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १६८/२०२४ भादवि कलम ४३८, ३२६, ५०४, ५०६, १४३, १४७,१४९,३,७ ५) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १०३ / २०१८ भादवि कलम ३२६, १४३,१४४,१४७,१४९,१४८ ६) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३८९ / २०२० आर्म अॅक्ट ४,२५

७) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३६१/२०१७ भादवि कलम १४२,१४३,१४६,१४७,३२३,५०४,५०६

सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा.पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर व विजयकुमार डोके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले, अर्शद सय्यद या तपास पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!