Homeक्राईमजांभुळवाडी परिसरात एका तरुणाचा निर्घुन खुन करुन पसार झालेल्या आरोपीला इंदौर, मध्यप्रदेश...

जांभुळवाडी परिसरात एका तरुणाचा निर्घुन खुन करुन पसार झालेल्या आरोपीला इंदौर, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेवून २४ तासाच्या आत केले जेरबंद, आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :-. 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर 

दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाचे सुमारास आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार हणमंत मासाळ, चेतन गोरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनांक १४/०६/२०२५ रोजी रात्रौ २२.३० वाजताचे सुमारास जांभुळवाडी तलावाचे बांधावर, आंबेगांव खुर्द पुणे येथे एका तरुणाचा निर्घुन खुन केला आहे. सदर माहितीची खात्री करणेकरीता आंबेगांव पोलीस स्टेशनचे वपोनि श्री शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रभारी मोहन कळमकर तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावून पाहणी केली त्या ठिकाणी एका तरुण मुलाचा खुन झाला असल्याचे दिसले. घडले प्रकाराबाबत इसम नामे दिपक सुरेश बंडगर, वय २१ वर्षे, प्रतिक हाईट्स, पारे कंपनी रोड, नन्हे पुणे यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२४ / २०२५, भारतीय न्याय संहीता कलम १०३, २३८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
खुन करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता खून करणारा इसम सुरज गणेश सुर्यवंशी, वय-२२ वर्षे, हा इंदौर मध्यप्रदेश येथे गेला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, सचिन गाडे असे इंदौर, मध्यप्रदेश येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी याचा शोध घेतला असता तो इंदौर, मध्यप्रदेश येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ – २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!