संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक १७/०६/२०२५ रोजीचे दुपारी ०३ / ३० वा. ते दि. १८/०६/२०२५ रोजीचे ०९/३० वा. चेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी नामे नामदेव सुदाम भंडारे, वय- ५७ वर्षे, धंदा- मेकॅनिक, रा. ओमकार नगर, लेन नं. ०७, गणेश फ्लोअर मिलचे शेजारी, अप्पर बिबवेवाडी पुणे यांचे घराचे कुलुप कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन फिर्यादी यांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करुन नेला आहे म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.१५१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१ (४), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अमंलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार १०४४२ आशिष गायकवाड, पोलीस अंमलदार ८६०१ शिवाजी येवले यांनी २५० ते २७५ सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिनुसार दाखल गुन्ह्यातील विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १५१/२०२५ आणि १३१/२०२५ गुन्हे केलेचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने विधीसंघर्षीत बालकांनी एका सोनाराकडे विकल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेली रोख रक्कम मौजमजेसाठी खर्च केल्याचे सांगितले. सोनार यांचेकडून एकुण ७२,०००/- रु. सोन्याचांदीची लगड दाखल गुन्ह्याचे पुरावेकामी जप्त करून वर नमुद दोन गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, रक्षित काळे, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, संतोष बनसुडे, राहुल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























