Homeक्राईमघरफोडीतील सराईत आरोपी मिरा-भाईंदरमधून जेरबंद; बिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई.

घरफोडीतील सराईत आरोपी मिरा-भाईंदरमधून जेरबंद; बिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

बिबवेवाडी पो स्टे गु.र.नं. ६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ मधिल फ़िर्यादी चे भाचा इसम नामे सज्जन तारारामजी चौधरी व दुकानातील कामगारांनी दिनांक ३०/०३/२०२६ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०७/३० वा. चे सुमारास मयुर स्वीट दुकान उघडले व दिवसभर दुकानातील स्विट व स्नॅक्स विक्री केली. दुकानात दुध पुरवठा व बेकरी प्रोडक्ट पुरवठा करणायांचे पैसे देणे असल्याने दि. ३०/०३/२०२६ रोजी दिवसभर विक्री केलेल्या स्विट व स्नॅक्सचे पैसे दुकानातील टेबलच्या कॅश काऊंटरच्या ०४ वेगवेगळ्या ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवली होती व दुकान बंद करून दुकानातील कामगार आपापले घरी निघून गेले होते. दिनांक ३१/०३/२०२६ रोजी सकाळी ०७/३० वा. चे सुमारास इसम नामे सज्जन व कामगार टिकमसिंग रावत असे स्विटचे दुकान उघडणेकामी गेले असतां टिकमसिंग यास दुकानाचे शटरचा कोयंडा कशाचेतरी सहाय्याने तोडलेला दिसून आला. त्यामुळे सज्जन चौधरी व टिकमसिंग यांनी मयूर स्विट दुकानात जावून पाहीले असता दुकानातील लाकडी टेबलचे कॅश काऊंटरच्या ०४ ड्रॉवर कशाचेतरी सहाय्याने उचकडून, त्याचे लॉक तोडून त्यामधील एकुण ५५,०००/- रु. रोख रक्कम, एक रिअलमी कंपनीचा मोबाईल व एक केसरचा डब्बा चोरीस गेला असल्याचे दिसल्याने सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे आदेशाने दिनांक ३१/०३/२०२६ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड हे सदर ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करत असताना सदर आरोपी गुन्हा करते वेळी फ़ोन वर बोलत असताना दिसत होता, त्यानुसार पो हवा विशाल जाधव व पो शि आशिष गायकवाड यांनी सदर ठिकाणचे तांत्रिक विष्लेशन केले असता घरफोडी करणारे आरोपी हे मिरा-भाईंदर या ठिकाणी असल्याचे समजले.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे यांचे मार्गदर्शनाने व त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड तसेच तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल जाधव, आशिष गायकवाड व ज्योतिष काळे असे मिरा-भाईंदर येथे जावून सदर पाहीजे आरोपी याचा तांत्रिक विश्लेषनाद्वारे शोध घेवून पाहीजे आरोपीस शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे नाव प्रिंस उर्फ़ जयदीप उपाध्याय असे सांगतले व सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्याचेकडे अधिक तपास केला असता सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयाचे आदेशाने येरवडा जेल येथे पाठविणेत आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहित्ते परिमंडळ २, पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, स.पो. फ़ौ १२८६ गायकवाड, पोलीस हवा. विनोद जाधव, पोलीस हवा. विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, राहूल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!