Homeक्राईमगंज पेठेत भांग गोळ्यांचा कारखाना उघड; खडक पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल...

गंज पेठेत भांग गोळ्यांचा कारखाना उघड; खडक पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खडक पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे : पुण्यातील गंज पेठेच्या मध्यवस्तीमध्ये भांगेच्या गोळ्यांचा मोठा कारखाना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खडक पोलिसांनी कारवाई करत ५२ वर्षीय महिलेच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांच्या माहितीनुसार करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंज पेठ परिसरात एक महिला भांगेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती अंमलदार आशिष चव्हाण यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गंज पेठ फायर ब्रिगेडजवळ धाड टाकली. जिन्याजवळ अंगणात बसलेल्या महिलेच्या जवळ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये संशयास्पद वस्तू दिसून आल्या. तपासणीअंती त्यात भांगेच्या गोळ्या आढळून आल्या. एकूण २८० गोळ्या आणि ४४० रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली. या गोळ्यांची किंमत तब्बल २८ हजार रुपये एवढी होती. ताब्यात घेतल्यानंतर रोहिनी सुरेश चव्हाण (वय ५२, रा. त्रिशूल मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) असे महिलेचे नाव असल्याचे समोर आले. पोलिसांनी चौकशी केली असता तिने थेट कबुली दिली की, घराच्या शेजारील खोलीतच ती भांगेच्या गोळ्या तयार करते. पोलिसांनी तत्काळ त्या खोलीची पाहणी केली असता तेथे तब्बल सात गोण्या भांग पावडर, गोळ्या तयार करण्याचे मशीन, वजनकाटे, मापे, टेबल, मोटार, लोखंडी शेगडी, फ्रीज आणि अन्य साहित्य असा एकूण १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल मिळाला. या कारवाईनंतर भांगेच्या गोळ्यांचा अवैध व्यवसाय उघड झाला असून, गंज पेठेसारख्या दाट वस्तीत असा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे हे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!