Homeक्राईमखुन करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.

खुन करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  *

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन 

दिनांक ११/०७/२०२५ रोजी २२.४२ वा चे सुमारास वैष्णवी बिल्डींग, एच.डी.एफ.सी एटीएम समोर, साईसिध्दी चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे एक मुलगास कोणीतरी चाकुने मारला आहे रक्त निघत आहे अशा आशयाचा कॉल एम.डी.टी डिवायसवर कॉल प्राप्त झाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेवुन घटनास्थळावर जखमी असलेल्या इसमास तात्काळ उपचाराकरता भारती हॉस्पीटलकडे पाठविले असता त्यांनी सदर इसमाची तपासणी करुन तो मयत झाल्याचे सांगितले. सदर मयत इसमाची ओळख पटविली असता त्याचे नाव आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे, वय १९ वर्षे, रा. मुपो ठेंगोडा, सटाना, जि. नाशिक असे असल्याचे समजले.
सदरची घटना गंभीर स्वरुपाची असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांना मयत इसमास जिवे ठार मारणाऱ्या आरोपीचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना आरोपी नामे धैर्यशील ऊर्फे सचिन बळीराम मोरे, वय २३ वर्षे, रा. सुवर्णयुग नगर, तीन बत्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे हा आंबेगाव पठार चिंतामणी शाळेसमोरुन पळुन जात असताना मिळुन आला. त्यांनी त्यास ताब्यात घेवुन मा. वरीष्ठांसमक्ष हजर केले. नमुद इसमाकडे अधिक तपास करता त्याने मयत इसम आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे यास कानाखाली मारल्याचे रागातुन लोखंडी हत्याराने वार करुन जिवे ठार मारल्याचे सांगितले.
फिर्यादी नामे दिनेश अरुण बागुल, वय ३६ वर्षे, धंदा रिपेरींगचा व्यवसाय, रा. बी ६०२, सदगुरु दर्शन सोसायटी, साईसिध्दी चौक, आंबेगाव पठार, पुणे यांनी त्यांचा भाचा आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे, वय १९ वर्षे, रा. मुपो ठेंगोडा, सटाना, जि. नाशिक यास इसम नामे धैर्यशील ऊर्फे सचिन बळीराम मोरे, वय २३ वर्षे, रा. सुवर्णयुग नगर, तीन बत्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे लोखंडी धारधार हत्याराने वार करुन जिवे ठार मारले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये नमुद आरोपीस अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रमेश चौधरी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नागेश पिसाळ, मिलींद गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!