संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर !
! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर !
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोहवा सचिन माळवे व पोशि दयानंद तेलंगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील आरोपी संकेत चोरघे याच्याकडे पिस्टल आहे. खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांनी संकेत चोरघे याच्याबद्दल माहिती घेतली असता संकेत चौरघे सर्वे नं १६/१ आंबेगाव पठार, साई सिध्दी अपार्टमेंट, पुणे येथे राहत असून त्याचे आंबेगाव पठार, तुकाई दर्शन व सिंहगड कॉलेज परिसरात येणे जाणे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दि. २४/०२/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथकास संकेत चोरघे सिंहगड कॉलेज कॅम्पस, वडगाव बु. येथे आला असल्याची माहिती मिळाली. पथकातील स्टाप सदर ठिकाणी गेला असता संकेत चोरघे त्याच्याकडील दुचाकीवरून पळून गेला.
खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संकेत चोरघे राहत असलेल्या स.नं १६ आंबेगाव पठार, पुणे या ठिकाणी रात्रभर सापळा रचून दि. २५/०२/२०२६ रोजी सर्वे नं १६/१ आंबेगाव पठार, पुणे येथून संकेत गोरख चोरघे, वय २३ वर्षे, रा. सध्या सनं १६/१, साई सिध्दी अपार्टमेंट, दत्त मंदिराशेजारी, आंबेगाव पठार, पुणे मुळ राहणार कोलवडी ता. वेल्हा, जि. पुणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व त्याचे मॅग्जिनमध्ये ०१ जिवंत काडतुसे असे एकूण ३५,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत भारती विद्यापीठ पो स्टे गु.र.नं. ७२ / २०२६ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), म.पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. निखील पिंगळे, मा.सहायक पोलीस आयुक्त – १ गुन्हे शाखा, श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक श्री. राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, गितांजली जांभुळकर, रहिम शेख व अमोल आवाड यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























