Homeक्राईमकाळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नोमन अरिफ सय्यद वय- २१ वर्षे...

काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नोमन अरिफ सय्यद वय- २१ वर्षे रा. गल्ली नं. १०, सय्यदनगर हडपसर पुणे यांचेवर एमपीडीए कायद्यान्वये काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुचीत केले होते. दि – १४/०३/२०२५ रोजी रात्रो ०१.१५ वाजताचे सुमारास फिर्यादी सय्यद नगर गल्ली नं १२ मध्ये झेप्टो अॅपवरुन स्विकारलेली आईस्क्रिमची डिलेव्हरी देण्या करीता जात असताना, अचानक त्यांचे मागून तीन अनोळखी इसमांनी त्यांचेकडील स्पेंडर गाडीवरुन येवून गाडीस त्यांची गाडी आडवी लावुन, त्यांचेकडील धारदार शस्त्राचा धाक दाखवुन, त्यापैकी सोबत असलेल्या इसमांपैकी इसम नामे नोमान अरिफ सय्यद याने फिर्यादी यांच्या शर्टच्या वरील खिशातील ओपो कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल व खिशातून रोख रक्कम रुपये ६३० /- जबरदस्ती काढून घेतली व फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता त्यापैकी शाहारूख याने फिर्यादीस त्याचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने मारून त्यामध्ये फिर्यादी यांनी हुकविण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या डाव्या कानाला लागल्याने जखमी करून, फिर्यादीस आंम्ही इथले भाई आहोत, इथे आमच्या नादाला कोणी लागत नाही तु पण लागु नको, नाहीतर वाईट अंजाम होईल. असे जोरजोरात आरडा-ओरडा करत त्यांचे हातातील हत्यार हवेत मध्ये फिरवत परिसरामध्ये दहशत निर्माण केली. म्हणुन काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा. रजि.नं. ६९ / २०२५ भारतीय न्याय संहिता ३०९ (६), ११८ (१), ३५१ (३), १२७ (२) सह हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रमाणे काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नामे नोमन अरिफ सय्यद वय २१ वर्षे रा. गल्ली नं. १०, सय्यदनगर हडपसर पुणे याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करुन, गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला असुन, त्याचेवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, दहशद निर्माण करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असुन, सदर आरोपीवर . वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
नमुद गुन्हयातील सराईत आरोपी नोमन अरिफ सय्यद हा वांरवार गुन्हे करुन, समाजासाठी धोकादायक व्यक्ती बनला असल्याने, सदर सराईत गुन्हेगार यांच्याविरुध्द सबळ पुरावे गोळा करुन, त्यावर एम. पी. डी. ए. कायदयान्वये कारवाई करण्याबाबतचा : प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी सराईत आरोपी नामे नोमन अरिफ सय्यद यास सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणा-या कृत्यांपासून परावृत करण्याचे दृष्टीने त्याचेविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलावृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स ), वाळुची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ ) (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन ५५ ) ( दुरुस्ती २००९) (दुरुस्ती २०१५) मधील कलम ३ (२) अन्वये स्थानबध्द कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त सो. पुणे शहर, मा. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो.हवा.७७७४ एच.जी. कांबळे, पो. हवा. २०५२ राजेद्र वाघमारे, पो.हवा. २५७० गाडे, पोलीस अंमलदार ८३०२ सागर सुर्यवंशी, पो. अंमलदार ४३०८ पुजारी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे. ‘

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!