Homeक्राईमहडपसर खून प्रकरण उघड : २० महिन्यांपासून फरार आरोपीला उत्तराखंडमध्ये जेरबंद.

हडपसर खून प्रकरण उघड : २० महिन्यांपासून फरार आरोपीला उत्तराखंडमध्ये जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०५ मे २०२४ रोजी उन्नतीनगर, हडपसर येथील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यास तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. पुढील चौकशीत सदर मृत इसमाचे नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५), रा. दिवा ईस्ट असे असल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक ०४ मे २०२४ रोजी लक्ष्मी कॅनॉल, स्वारगेट येथे मृत इसम व त्याचे ओळखीचे इसम यांच्यात वाद झाला होता. या वादातून दोघांनी संगनमत करून मृत इसमास कॅनॉलमध्ये ढकलून जिवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते
.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वास्तव्यास असलेला लॉज निश्चित करण्यात आला. त्यानुसार पोलीस तपास पथकाने दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी उत्तराखंड राज्यातील हरीद्वार येथे जावून आरोपी हॉटेलबाहेर येताच तात्काळ कारवाई करत आरोपी वैभव मनोज जाधव, वय २४ वर्षे रा. औरंगाबाद यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.मनोज पाटील मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, श्री. डॉ सागर कवडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री.अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय मोगले,, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, आकाश धावडे, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे व अमोल जाधव यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!