संपदाक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर !
दिनांक ०७/०४/२०२६ रोजी रात्रौ ११.४५ वा, सुमारास चरवडवस्ती वडगाव बु सिंहगडरोड पुणे येथे पाच ते सहा आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका इसमास लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्याचे जवळील पिस्टल मधुन फायरींग केल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली दि.०८/०४/२०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक, समीर करपे तसेच तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर तसेच पोलीस अंमलदार असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार विनायक मोहीते व तानाजी सागर यांना त्यांचे बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे शरद हॉस्पीटल पासुन प्रयोजा सिटीकडे जाणारे रोडच्या बाजुला कोणाची तरी वाट पाहत थांबलेले आहेत. अशी बातमी मिळाली असता, लागलीच त्यांनी सोबतचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, तसेच तपास पथकातील स्टाफ असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी करता बातमीतील वर्णनाचे पाच इसम हे सदर ठिकाणी उभे असल्याचे दिसले त्यांनी पोलीसांना पाहताच त्या ठिकाणावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता ते विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या पाच विधीसंघर्षित बालकांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ एक पिस्टल व दोन लोखंडी कोयते मिळुन आल्याने नमुद विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन श्री. विनय पाटणकर पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. समीर गायकवाड, यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक, भुपेश सांळुके, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिष मोरे, पंकज देशमुख, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, विनायक मोहीते व शिरीष गावडे, यांनी केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























