Homeक्राईमलोणी काळभोर पोलीसांनी दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत...

लोणी काळभोर पोलीसांनी दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत काडतुसे केले जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणी काळभोर पोलीस स्टेशन !

दिनांक १७/१०/२०२५ रोजी सकाळी १०/०० वा. चे सुमारास इसम नामे राजेंद्र बबनराव काळभोर वय ५५ वर्षे रा. लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे यांनी त्यांची दुचाकी अॅक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही लोणी काळभोर येथील स्मशानभुमीसमोर पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची दुचाकी गाडी चोरुन नेली होती. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. १७/१०/२०२५ रोजी गु. र. नं. ४७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवीणेत आला होता.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने सतत ४ दिवसांमध्ये सुमारे १६५ कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बिबवेवाडी चे दिशेने चोरीची मोटारसायकल घेवुन गेल्याचे निदर्शनास आले. प्राप्त माहितीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी सदर भागामध्ये कौशल्यपुर्णरित्या आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचे ठावठिकाणाबाबत त्यांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीसांनी सापळा रचुन आरोपीस दि. २८/१०/२०२५ रोजी २१/४० वा. ताब्यात घेवुन अटक केली आहे.

अटक मुदतीत लोणी काळभोर पोलीसांनी आरोपीकडे तपास केला असता त्याचे नाव अरुण बाबुराव देशमुख वय ६७ वर्षे रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली अॅक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही दुचाकी जप्त करणेत आली आहे.

नमुद आरोपी हा चोरीचे गुन्हे करण्यात सराईत असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने आरोपीचे राहते घराची दि. २९/१०/२०२५ रोजी पंचांसमक्ष घरझडती घेतली. घरझडती दरम्यान नमुद आरोपीचे राहते घरातील एका बॅग मध्ये एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर), १० जिवंत काडतुसे व बनावट चाव्या मिळुन आल्या आहेत. सदर रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या पंचांसमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त करणेत आले आहेत.

सदर गुन्हा अज्ञात आरोपींविरुध्द दाखल असताना, तसेच आरोपीतांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपुर्णरित्या अज्ञात चोरटयांचा शोध घेवुन, त्यास गुन्हयात अटक करुन, त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच घरझडती दरम्यान रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या असा एकुण ६५०००/- रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पो. अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, दडस, गिरी, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!