Homeक्राईमफुरसुंगी पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणारा चोरटा अटक आरोपीकडून २,२०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल...

फुरसुंगी पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणारा चोरटा अटक आरोपीकडून २,२०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर !

फिर्यादी श्री मयुर अशोक अग्रवाल, वय ३६ वर्षे, धंदा नोकरी, रा. कृष्ण कुंज, सरिता नगर, दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे, मंतरवाडी, उरुळी देवाची, ता हवेली, जि. पुणे हे दि. २४/०८/२०२५ रोजी सकाळी ११:३० चे सुमारास त्यांचे कुटूंबियासह त्यांचे घर बंद करून लॉक लावून त्यांचे व्यवसायाकरीता भोसले गार्डन, हडपसर, पुणे येथील स्टॉलवर गेले होते. दिनांक २५/०८/२०२५ रोजी रात्री १०:०० वा. पर्यंत त्यांचे कामकाजामुळे ते त्यांचे घरी न येता सातववाडी, हडपसर, पुणे येथे थांबले होते. दि. २४/०८/२०२५ रोजी सकाळी ११:३० वा ते दिनांक २५/०८/२०२५ रोजी रात्री १०:०० वा. पर्यंतचे कालावधीमध्ये फिर्यादी घरी नसल्याचे पाहुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या बेडरुममधील स्लायडिंग खिडकीतुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील एकुण ०४,९५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चांदीची गणपतीची मुर्ती व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेल्याने फिर्यादीने कायदेशीर फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. २८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेले मुद्देमालाचा मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोहवा नितीन गायकवाड, पो. अंमलदार हेमंत कामथे यांनी परिसरातील ६१ सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली. पोलीस हवालदार नितीन गायकवाड व हेमंत कामथे हे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, घरफोडी करणेकरीता वापरलेली मोटारसायकल पावर हाऊस, फुरसुंगी परिसरात संशयीतरित्या दिसून आली आहे. वरील पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे फुरसुंगी परिसरामध्ये जावून कसून शोध घेतला असता, रेल्वे पटरीजवळ, गोडावूनचे मागे, फुरसुंगी, पुणे येथे बातमीतील संशयीत मोटारसायकल दिसून आली. मोटारसायकलबाबत माहिती घेतली असता ती मोटारसायकल आर्यन अजय माने, रा. रेल्वे पटरीजवळ, आशिर्वाद पार्क, फुरसुंगी, पुणे हा वापरत असल्याची माहिती मिळाली.
मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनामध्ये तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस हवा. नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पो. अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमन, नितीन सोनवणे यांनी सापळा रचून संशयित इसम आर्यन माने दिसुन येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील संशयीत इसम नामे आर्यन अजय माने यास फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासत घेवून तपास केला असता आर्यन माने याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी नामे आर्यन माने हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने पुणे शहरात लष्कर, वानवडी, पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात यापुर्वी घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. वरील घरफोडीतील चोरी केलेला मुद्देमाल त्याने त्याचा साथीदार जावेद अबुबखर बागवान, रा. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे यास विल्हेवाट लावण्याकरीता दिला असल्याचे तपासामध्ये आढळुन आले, तपासामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १,६०,०००/- रुपये किंमतीचे सोने व आरोपीने चोरी करणेकरीता वापलेली दुचाकी असा मिळुन एकुण २,२०,०००/ रुपयांचा मुद्देमाल गुन्हात जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री राजेश खांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोउनि विष्णू देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पो.अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमन, नितीन सोनवणे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
वरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!