संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर !
दिनांक ०५/०५/२०२६ रोजी युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड व पोलीस अंमलदार असे मिळुन पुणे पोलीस आयुक्तालय पुर्व विभागात समांतर रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे व तानाजी देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साहिल शाम नरळकर हा इसम गंगानगर, फुरसुंगी या परिसरामध्ये फिरत असुन त्याच्याकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह जावुन शिताफिने संशयीत इसमाला जाग्यावर पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आले. सदरचा एकुण ४१,२००/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे साहिल शाम नरळकर वय २५ वर्षे रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमुर्ती हाईसींग सोसायटी, भोसरी, पुणे याचेविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८३/२०२६ आर्म अॅक्ट क. ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, गणेश माने, शेखर काटे व उमेश शेलार यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























