Homeक्राईमचांदीच्या दागिण्यांचे दुकान फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस खडक पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन...

चांदीच्या दागिण्यांचे दुकान फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस खडक पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन उत्तरप्रदेश येथुन अटक व ३६ किलो ४४२ ग्रॅम मालमत्ता हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खडक पोलीस स्टेशन पुणे शहर !

फिर्यादी विनोद देवीचंद परमार यांचे गुरुवार पेठ, पुणे येथे चांदीच्या दागिण्यांचे होलसेल दुकान आहे. दि.१४/०९/२०२५ रोजी रात्रौ २०:३० वा ते दि. १५/०९/२०२५ रोजी रात्रौ ०२:४५ वा. चे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी याच्या नमुद दुकानाचा दरवाजा तोडुन दुकानातुन एकुण ६७,६०,०००/- रुपये किंमतीच्या ७० किलो चांदीच्या वस्तु व रोख रक्कम चोरुन नेली अशा फिर्यादी याच्या तक्रारी वरुन अज्ञात इसमाविरूद्ध खडक पोलीस स्टेशन गु.र.नं ४७६ / २०२४ भा न्याय संहीता कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. वरिष्ठांनी खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील सपोनि अर्जुन कुदळे व पोउपनि महेंद्र कांबळे यांची दोन पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले होते. घटनास्थळ व आजु बाजुच्या परिसरातील वेगवेगळ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासुन तात्रिक तपास केला असता यातील संशयीत आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी परिधान केलेले कपडे बदलुन पुणे रेल्वे स्टेशन येथुन रेल्वेने उत्तरप्रदेश येथे गेले असल्याचे दिसुन आले. आरोपी बाबत खात्री लायक माहीती घेवुन सपोनि अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे हे वरिष्ठांच्या आदेशाने विना विलंब उत्तरप्रदेश येथे रवाना होवुन दि. १८/०९/२०२५ रोजी कुंडा, प्रतापगढ, राज्य उत्तरप्रदेश येथुन दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेश महाराणीदिन सरोज वय – ३६ वर्षे, धंदा- ड्रायव्हर पत्ता माघी चैनगड, थाना महेंशगंज, ता.कुंडा. जिल्हा – प्रतापगड, राज्य- उत्तरप्रदेश, यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. तपासादरम्यान अटक आरोपी याच्याकडे तसेच पाहीजे आरोपी यांच्या कुंटुबीयांकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्यांनी नमुद गुन्ह्यात चोरुन नेलेल्या मालमत्तेपैकी ४८,४५,३५०/- रुपये किंमतीची एकुण ३६ किलो ४४२ ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तु हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

नमुद गुन्ह्यातील आरोपी हे उत्तरप्रदेशातील प्रतापगढ परिसरातील असुन प्रतापगढ परिसरातील बहुतांश लोक हे पुणे व मुंबई येथे हमालीचे व मजुरीचे काम करतात. तपासादरम्यान आरोपी हे त्यांच्यागावाकडील पुणे मुंबई कडील सहकाऱ्याकंडे राहुन अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे दिसुन येत आहे. सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. कृषीकेश रावले, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, व मा. श्रीमती अनुजा देशमाने, सहा पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन पुणे, सहा पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेंद्र कांबळे, स्वप्निल बनकर, पोलीस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, निलेश दिवटे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, योगेश चंदेल, विकास पांडोळे, काळे, शोयब शेख, अर्जुन कुडाळकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.मयुर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!