संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! गुन्हे शाखा युनिट-२, पिंपरी चिंचवडची !
मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातिल हद्दित रात्रीचे वेळी बंद घरांचे कुलुप तोडुन घरफोडया होण्याचे बरेच प्रकार घडले होते. तेव्हा मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साो, यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेवुन गुन्हे शाखेस सदर प्रकारात लक्ष घालुन आरोपी अटक करुन गुन्हे उघडकीस आन प्रतिबंध करणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली सपोआ, गुन्हे-१, विशाल हिरे, गुन्हे शाखा युनिट – २ पिंपरी चिंचवडचे वपोनि, अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे आणि गुन्हे शाखा युनिट-२ चे अंमलदार हे पिंपरी चिंचवड हद्दिमध्ये होत असलेल्या घरफोडया बाबत तपास करत असताना असे निदर्शनास आले की, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दमध्ये एका घरात रात्रीचे वेळी चोरी झाली असुन चोरटयांनी त्या घरातुन MH14 JE 2628 सेलेरिओ गाडीची चावी घेवुन पार्किंग मध्ये लावलेली सेलेरिओ गाडी चोरी करुन घेवुन गेले आहेत. तसेच दि. २३/११/२०२५ रोजी रावेत पोलीस ठाणे हद्दमध्ये त्याच सेलेरिओ गाडी मधुन येवुन घरफोडी करुन सोनं-चांदीचे दागिने चोरी करुन घेवुन गेल्याने रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ५६९/२०२५ बी.एन.एस कलम-३०५, ३३१(२) प्रमाणे गुन्हा नोंद होता.
तेव्हा गुन्हे शाखा युनिट – २ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे दोन्ही घटनांच्या अनुषंगाने तपास करत असताना सदर पथकाने अंदाजे २०० ते २५० सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे नेहमी चोरी करुन जुन्या पुणे-मुंबई हायवेने सोमाटणे टोल नाक्या वरुन लोनावळयाच्या दिशेने जात असल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते.
तेव्हा दि. २७/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ चे वपोनि अरविंद पवार हे स्वतः रात्री ०२:०० वा. सोमाटणे टोल नाका येथे जावुन त्यांनी स्वतः नियोजन करुन गुन्हे शाखा युनिट – २ चे पोउपनि मयुरेश साळुंखे, पोलीस अंमलदार संजय गवारे, तुषार शेटे, विक्रम कुदळ, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रांत चव्हाण, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, अमर राणे, धनंजय जाधव, सुखदेव गावंडे अशा बारा जणांच्या तीन टीम तयार करुन त्यांना कामे वाटुन दिली. त्याच वेळी साधारण ०५:३० वा सविधान चौक येथिल टिमने कळविले की नमुद वर्णनाची व नंबरची गाडी ही सविधान चौक येथुन पास झाली आहे आणि काही काही वेळातच गाडी सोमाटणे टोल नाका लेन नंबर – ३ मध्ये आली असता सदर गाडी मधील इसमांना बाहेर येण्यास सांगितले असता. गाडीचे पाठी मागे बसलेल्या इसमाने वपोनि पवार तसेच अंमलदार यांचे दिशेने फायर केला. परंतु आरोपी आणि अंमलदार यांचे मध्ये झटापट झाल्याने फायर हा गाडीचे वरच्या बाजुस लागल्याने कोणास इजा झाली नाही त्याच वेळी पोहवा राठोड यांनी त्याचा हात पकडुन त्याचे हातातुन पिस्टल काढुन घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सनीसिंग पापासिंग दुधानी वय २४ वर्षे रा- हडपसर, पुणे २) जलसिंग रजपुतसिंग दुधानी वय ३२ वर्षे रा- हडपसर, पुणे ३) मनिष बाबुलाल कुशवाह, वय-२८ वर्षे, रा-गाव-कैलास, तहसिल कैलास, जिल्हा- मुरायना, राज्य म.प्रदेश असे असल्याचे सांगुन त्यांचे कडुन ०२ पिस्टल आणि ०७ जिवंत काडतुसे, धारधार हत्यारे तसेच सोन्याचे दागिने जप्त करुन त्यांचे विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ३६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२१(१), ११८(१) सह आर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५) मपोका कलम – ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांचे कडे केलेल्या तपासात त्यांनी रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ५६९/२०२५ बी. एन. एस कलम -३०५, ३३१(२) हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांच्या कडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे कडुन २९,४४,७००/- रु. किं चे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करुन खालील प्रमाणे एकुण १२ गुन्हे उघडकिस आले आहेत.
) तळेगाव पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ३६५/२०२५ बी.एन.एस१०९,१२१(१),११८(१) आर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५) २) चिचंवड पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ५०५/२०२५ बीएनएस ३०३ (२)
३) रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर-५६९/२०२५ बीएनएस ३०५, ३३१ (२)
४) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ९७९ / २०२५ बीएनएस ३०३ (२), ३०५ (१), ३३१ (४)
५) बाणेर पोलीस ठाणे, गु.र.नंबर- २८६/२०२५ बीएनएस ३०५,३३१ (२), ३३१(४)
६) कोथरुड पोलस ठाणे, गु.र.नंबर – ३३४ / २०२५ बीएनएस ३०५,३३१ (४)
७) वाकड पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ६१०/२०२५ बी. एन. एस ३०५, ३३१ (४), ३२४ (४),३(५)
८) वाकड पोलीस ठाणे, गु.र.नंबर-३२४/२०२५ बीएनएस ३०५,३३१(३),३३१(४) ९) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ५६३/२०२५ बीएनएस ३०५,३३१(३) १०) पिंपरी पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ४३६/२०२५ बीएनएस ३०५ (अ) ३३१(४) ११) निगडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर – ४९८/२०२५ १२) निगडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-५८४ /२०२५
बीएनएस ३०५ (अ) ३३१ (२)(३),(४) बीएनएस ३०५ (अ), ३३१(३)
तसेच त्यांचे कडुन सोन्याचे दागिने विकत घेणारे आरोपी नामे १) किरपानसिंग शितलसिंग दुधानी वय ३७ वर्षे रा. भैरवनाथ नगर कुसगाव ता मावळ जि पुणे २) शांताराम ऊर्फ संतोष गुरप्पा कांबळे, वय-३० वर्षे, रा- भैरवनाथ नगर कुसगाव ता मावळ जि पुणे ३) अक्षय राजु चनाल, वय – ३० वर्षे, रा- शिवाजी पेठ, खंडाळा, ता- जि-पुणे यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ चे पोउपनि मयुरेश साळुंखे हे करत आहेत.
मावळ,
तसेच सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील घरफोडी व जबरी चोरी करणारे गुन्हेगार असुन आरोपी नामे सनीसिंग पापासिंग दुधानी हा मोक्का जेल रिलिज आरोपी असुन त्याचे वर एकुण- ७१ गुन्हे दाखल आहेत, आरोपी नामे जलसिंग रजपुतसिंग दुधानी याचे वर एकुण-५६ गुन्हे दाखल आहेत, आरोपी नामे मनिष बाबुलाल कुशवाह याचे वर एकुण-७१ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे किरपानसिंग शितलसिंग दुधानी याचे वर २३ गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सपोआ, गुन्हे- १ मा. श्री. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-२, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, श्रेणी पोउपनि दिपक खरात, सपोउपनि संजय गवारे, प्रविण दळे, नितिन ढोरजे, पोहवा/कृणाल शिंदे, पोहवा / तुषार शेटे, पोहवा / मोहम्मद गौस नदाफ, पोहवा / भाऊसाहेब राठोड, पोहवा/विक्रम कुदळ, पोहवा/बाबा चव्हाण, पोहवा / अली शेख, पोहवा / कृष्णा शितोळे, पोशि/प्रशांत सैद, पोशि/ सुखदेव गावंडे, पोशि/अमर राणे, पोशि/ दिनकर आडे, पोशि/ रवि पवार, पोशि/ धनंजय जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























