Homeक्राईमखराडी पोलीसांनी अटटल घरफोडयाकडुन एकुण रु.५,४०, ९७५/- चा ऐवज हस्तगत करुन घरफोडीचा...

खराडी पोलीसांनी अटटल घरफोडयाकडुन एकुण रु.५,४०, ९७५/- चा ऐवज हस्तगत करुन घरफोडीचा ०१ गुन्हा व वाहन चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आणुन आरोपीस केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २५/०५/२०२५ रोजी एका अज्ञात इसमाने आपले घर सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडुन रु.६,४६,०००/- चे सोन्याचे दागिन्याची घरफोडी केल्याने खराडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. ९६/२०२५ भा न्या सं कलम ३३१ (३), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता…
सदर गुन्हयाच्या तपासात खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वजित जगताप यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देउन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकाच्या दोन टिम तयार करण्यात आल्या होत्या.
नमुद गुन्हयाच्या तपासात दि. ०१/०९/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व पोलीस हवालदार ६६१५ / श्री महेश नाणेकर, पोलीस शिपाई ४३५२ / श्रीकांत कोद्रे, पोलीस शिपाई ४७३४ / श्री विलास केदारी यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे, वय ३५ वर्षे राहणार पठारे ठुबे नगर, खराडी यास खराडी परिसरातुन सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्यास मा न्यायालयाने प्रथम ०७ दिवस व तदनंतर ०६ दिवशी अशी एकुण १३ दिवस पोलीस रिमांड मंजुर केले. तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस कोठडी दरम्यान तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व तपास पथक अंमलदार यांनी आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याचेकडुन एकुण रु. ५,४०,९७५/- किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, ०७ विविध कंपनीचे मोबाईल फोन व ३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन त्याचेकडुन १) खराडी पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र. १५६/२०२५ भा न्या स कलम ३०३ ( २ ) प्रमाणे व २) लोणीकंद पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. ३४६ / २०२५ भा न्या स कलम ३०३ (२) अन्वये असे ०२ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. अधिकच्या तपासात नमुद आरोपी याचेविरुध्द मालमत्ता चोरीचे ०६ गुन्हे दाखल असुन त्याने सदर गुन्हा करण्यासाठी वापर केलेल्या मोटार सायकलच्या नंबर प्लेटमध्ये बदल करुन त्या आधारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता कलम ३३६ (२), ३३६ (३), ३(५) अन्वये कलम वाढ करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोजकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनावणे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, वसीम सयद, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, जयवंत श्रीरामे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!