Homeक्राईमएक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे व शंकर कुंभार यांना गुप्त बातमी मिळाली की, दरीपुलाखाली जांभुळवाडी आंबेगाव खुर्द पुणे येथे रोडवर एक इसम अग्नीशस्त्रे जवळ बाळगुन थांबला असुन त्याने अंगात राखाडी जर्कीग व काळे रंगाचे पॅन्ट घातलेली आहे. सदरची खात्रीशीर बातमी मिळताच सदर बातमी युनिट-२ प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळवले असता त्यांनी सदरबाबत खात्री करु कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह नमुद ठिकाणी छापा टाकुन संशयित इसमास ताब्यात घेतले. सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओंकार महेश थोरात वय २५ वर्ष रा. प्लॅट क्रमांक ३०१ साई माऊल हाईटस लिपाणी वस्ती आंबेगाव खुर्द ता. हवेली जि पुणे असे असल्याचे सांगितले. सदरवेळी त्याचेकडे ४०,८००/- रु.किं.चे एक पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आले. सदर आरोपी सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२६/२०२६ भा.न्या.सं.क. ११८(२) ३५२ संह ४ (२५) म.पो.अधि.क. ३७ (१) (३) सह १३५ मधील पाहिजे आरोपी आहे. सदर आरोपी व अग्निशस्र जवळ ठेवणारे इतर दोन साथीदारांवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. १५८/२०२६ आर्म अॅक्ट क. ३ (२५) म.पो.अधि.क. ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीवर यापुर्वी शरिराविरुध्द ०३ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्वीनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, संतोष टकले, सर्जेराव टकले, नागनाथ राख, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना ताम्हाणे, सद्दाम तांबोळी, विनोद चव्हाण, रुषिकेश व्यवहारे, संजय आबनावे, ओमकार कुंभार व विनायक वगारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!