Homeक्राईमहडपसर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी — वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणत...

हडपसर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी — वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणत गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०६/१०/२०२५ रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत कोजागिरी पौर्णिमानिमित्त हडपसर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करीत होते. पेट्रोलींग दरम्यान पोलीस अंमलदार अमित साखरे आणि महावीर लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार मांजरी परिसरात संशयितांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस मिळून
आले.
नमुद विधीसंघर्षित बालक यांचेकडे केले कौशल्यपुर्ण चौकशीत संबधित अल्पवयीन बालकांनी गेल्या वर्षभरात त्यांनी मौजमजेसाठी हडपसर परिसरान अनेक दुचाकी व रिक्षा चोरी करून नंतर विविध ठिकाणी सोडून दिल्याबाबत सांगितले. तपासात त्यांनी ८ गुन्ह्यांची घटनास्थळे दाखवून गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!