Homeक्राईमस्वारगेटमध्ये अवैध हुक्का पार्लरवर मोठी कारवाई, एलडिनेरो हॉटेलवर छापा.

स्वारगेटमध्ये अवैध हुक्का पार्लरवर मोठी कारवाई, एलडिनेरो हॉटेलवर छापा.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर !

स्वारगेट पो.स्टे. दि.३०.०१.२०२६ रोजी हद्दीत लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असलेबाबत खबर प्राप्त होताच स्वारगेट पो.स्टे. कडील पो.नि. विकास भारमळ, मपोउपनि सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोअंम टोणपे, पोअंम कुडाळकर, चालक पोअंम ठोंबरे, मार्शल पोअंम जाधव व साळवे यांनी प्राप्त माहितीचे ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी मोदी प्लाझा बिल्डीग, तिसरा मजला वरील एलडिनेरो हॉटेल येथे गेले असता सदर हॉटेलचे शटर आतून बंद होते. शटर उघडण्यासाठी वारंवार आवाज देवून देखील हॉटेलचे आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने फायरब्रिगेड जनता अग्नीशमन केंद्र जनता वसाहत पर्वती पुणे ०९ यांना घटनास्थळी बोलावून त्यांचे स्टाफ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने मोदी प्लाझा एलडिनेरो हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये बेकायदेशीररित्या ग्राहकांकडुन रोख रक्कम घेवुन तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरिता कामगाराकरवी आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास धोकादायक/अपायकारक असा अवैधरित्या हुक्का, सेवना करिता हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना विक्री करताना मिळुन आले. तसेच विविध हुक्का पॉट, चिलीम, वेगवेगळे प्रतिबंधीत तंबाखूजन्य फ्लेवर व अन्य साहित्य मिळून आले. सदर बाबत हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार, वय – ३३ वर्षे, रा. गुलटेकडी स्वारगेट पुणे. याचेकडे विचारणा करता त्याने हॉटेलचे मालक प्रतिक विकास मेहता, रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे यांचे सांगणेवरुन हॉटेलमधील वेटर यांचेकरवी, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले.

सदर बाबत एलडिनेरो हॉटेल, मोदी प्लाझा, स्वारगेट याचे मालक प्रतिक विकास मेहता, हॉटेल मालक सनी सुंदर परिहार व हॉटेलमधील वेटर दिपक सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादुर परिहार यांचेवर स्वारगेट पो.स्टे. गु. रजि.नं. २०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम- २०१८ चे कलम ४ अ, २१ – अ, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून एकूण रु. २२,५६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेंद्र बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त साो, परि. २ पुणे शहर श्री मिलींद मोहिते, मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो.स्टे. चे मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विकास भारमळ, महिला पोलीस उप निरीक्षक सुजाता जाधव, व पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, जाधव, साळवे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!