Homeक्राईमशिवाजीनगर मोबाईल स्नॅचिंग उघड; युनिट १ गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई.

शिवाजीनगर मोबाईल स्नॅचिंग उघड; युनिट १ गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि.०४/०१/२०२६ रोजी २२/३० वा.चे दरम्यान जे. एम. रोड, जंगली महाराज मंदिरासमोर, शिवाजीनगर येथे फिर्यादी हे कॅबची वाट पाहत उभे असताना अचानक एका दुचाकीवरील दोन इसमांन पैकी एकाने फिर्यादी यांचे हातामधील किं. रु.७०,०००/- चा सॅमसंग कंपनीचा एस-२५ अल्ट्रा मोबाईल फोन हा हिसकावुन घेऊन पळुन गेले होते. त्याप्रमाणे दि.०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांचे तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांविरुध्द शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०६/२०२६ भा.न्या.सं.क. ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा युनिट १, गुन्हे शाखा मार्फतीने समांतर तपास करीत असताना घटनास्थळाजवळील मिळालेल्या सीसीटी व्हि फुटेजच्या आधारे युनिट १ कडील पोलीस अंमलदार डोंगरे व युवराज कांबळे यांना त्यांचे बामतीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हयातील फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावुन नेणारा आरोपी हा शिवाजीनगर पाटील इस्टेट भागात राहण्यास असुन तो रात्री उशिरा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नंबर २ कडील सिमा भिंती जवळील पार्किंगमध्ये येणार आहे. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अजित जाधव युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन देवुन सदर ठिकाणी सापळा रचन्यास सांगितले असता युनिट १ कडील पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे व पोलीस अंमलदार असे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नंबर २ कडील सिमा भिंती जवळील पार्किंगमध्ये रात्री सापळा रचुन थांबले असता काही वेळातच सदर ठिकाणी मिळालेल्या बातमीतील इसम हा आला असता त्यास वर नमुद पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी अतिशय शिताफीने पकडुन त्याला त्याचे नाव व पता विचारला असता त्यांने त्याचे नाव राकेश गोवर्धन वाघीरे, वय २५ वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, प्लॉट नं.०८, गल्ली नं. ०१, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे असे सांगितले. नमुद आरोपीची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ७०,०००/-रु.किं चा एक सॅमसंग  कंपनीचा मोबाईल व ६५,०००/-रु.किं.ची होंडा अॅक्टीवा मोपेड तिचा तिचे पुढच्या बाजुचे हेड लाईट व त्याखालील फ्रंट गार्ड नसलेले असा ऐवज मिळुन आल्याने त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल हा त्याने व त्याचा साथीदाराने मिळुन जंगली महाराज मंदिरासमोर, शिवाजीनगर येथे उभा असलेल्या एका इसमांच्या हातातुन हिसकावुन चोरी केला असल्याचे कबुल केले. त्यास पुढील अधिक तपासकामी शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री.पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, श्रेणी पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व संदेश काकडे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

error: Content is protected !!