Homeक्राईमव्यावसायीकास बदनामी व त्याचे कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देवून १० लाखाची खंडणी...

व्यावसायीकास बदनामी व त्याचे कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देवून १० लाखाची खंडणी मागून ती स्विकारणाऱ्या खंडणीखोराच्या बिबवेवाडी पोलीसांनी रंगेहात पकडून मुसक्या आवळल्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *

बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

सदर बाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पुणे येथील व्यवसायीक गौरव प्रमोद दुगड, रा. वसंतबाग सोसायटी, बिबवेवाडी पुणे यांना त्यांचे मोबाईलवर त्यांचेकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे, रा. गुरूदत्त अपार्टमेंट बालाजीनगर, धनकवडी पुणे याने तक्रारदार यांचे वडीलांचे मोबाईल मधून अश्लिल मॅसेज स्वतःचे मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रिनशॉट काढले व ते स्क्रिनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जिवे ठार मारणेची धमकी देवून १० लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रारदाराने तक्रार दिली.
तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य वाटत असल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने खात्री करून तात्काळ सापळा रचला. त्याच वेळी आरोपीने तक्रारदार यांना फोनवर मॅसेज करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेवून पुष्पा हाईट्स, दुसरा मजला, पुष्पमंगल चौक, पुणे येथे येण्यास कळविले.
त्यावेळी बिबवेवाडी पोलीसांनी सापळ्याची तयारी केली व खंडणीखोरास देण्यासाठी डमी व चलनी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मॅसेज पाठवून दिले. त्यावर आरोपी वरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्याने सदरबाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीसांनी साध्या वेशात जावून सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले. त्यास त्याचे नाव पता व खंडणी मागणेचे कारण विचारले. त्याने मार्केटमध्ये उधारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले. आरोपीने स्विकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून व आरोपीस ताब्यात घेतले. सदर घटनेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ६८ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीस लागलीच अटक करून मा.न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ३१/०३/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवा. संजय गायकवाड, संतोष जाधव, पो.शि. सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, दत्ता शेंद्रे, निलेश पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!