Homeक्राईमलोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद, सुमारे...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद, सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थाची विक्री करणारे यांची गोपनीय बातमीदारा मार्फतीने माहिती प्राप्त करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. लोणीकंद पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचनांची माहिती देवून अंमली पदार्थाची विक्री करणारे इसम ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत कळविले. त्याअनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १९/०४/२०२६ रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कैलास साळुंके व स्वप्नील जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कटकेवाडी फाटा, लोणीकंद, पुणे या ठिकाणाहुन इसम नामे पुंजाजी जयचंद्र चौधरी, वय ४० वर्ष, रा. जय मल्हार सोसायटी, फुलमळा रोड, वाघोली, पुणे मुळपत्ता मु. पो. निपाणा, ता. मोताळा, जि. बुलढाणा यास ताब्यात घेवुन झडती घेतली असता नमुद इसमाकडे ४,३७,२००/- रुपये किंमतीचे एकुण २१.८६० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) व ५०,०००/-रुपये किंमतीचा त्याचा वापरता आयफोन मोबाईल असा एकुण ४,८७, २००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात आली.

त्याचप्रमाणे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पेरणे फाटा, पुणे येथे इसम नामे १) राजेंद्र केरु टेळे, वय ३५ वर्ष, रा. अथर्वनगर, चाकण रोड, शिक्रापुर, पुणे २) करन सचिन मोहिते, वय २१ वर्ष, रा. सणसवाडी, पुणे यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एकुण ११,८३,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५९.९६० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी), एक कार, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण १४,१०,९७०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन नमुद इसमांविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात आली. तद्नंतर वर नमूद अटक आरोपीकडे अधिक तपास करुन दिनांक २२/०४/२०२६ रोजी इसम नामे १) भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित, वय २८ वर्षे, रा. मांजरी, पुणे मुळपत्ता राजस्थान २) आदिनाथ दशरथ शिर्के, वय २९ वर्षे रा. मांजरी, पुणे यांना मगर वस्ती, लोणीकंद, पुणे येथुन ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एकुण ४,२८,६००/- रुपये किंमतीचे एकुण २१.४३० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) व ४,००,०००/- रुपये किंमतीची कार तसेच त्यांचे वापरते मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकुण ८,३४,०२०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपींना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली.

तद्नंतर वरील तिन्ही अटक आरोपींकडे एकत्रित तपास करुन दिनांक २३/०४/२०२६ रोजी इसम नामे योगेश लक्ष्मण चव्हाण, वय ३७ वर्षे, रा. आझाद गल्ली, शहाजी चौक, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकुण १४,५०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ७२.५०० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) जप्त करुन त्यास गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे वर नमुद केलेल्या कारवाई दरम्यान एकुण ०६ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण ३४,९८,८००/- रुपये किंमतीचे एकुण १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) जप्त करण्यात आले आहे.आतापर्यंत एकुण १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम. डी) ४१,९६,०००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोजकुमार पाटील मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर श्रीमती नूतन पवार यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे श्रीमती सुनिता रोकडे, तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बंदगुडे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, गणेश गायकवाड, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, शंकर क्षिरसागर, संदीप पाचंगे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!