Homeक्राईमरांजणगाव एमआयडीसीत 68 लाखांची चोरी उघड; 72 तासांत पोलिसांची मोठी कामगिरी.

रांजणगाव एमआयडीसीत 68 लाखांची चोरी उघड; 72 तासांत पोलिसांची मोठी कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन !

रांजणगाव ता शिरुर जि पुणे येथे असलेल्या चमाडीया गोडाउन मध्ये आयटीसी कंपनिचे सिगारेट, बिस्किट, साबण, सिगारेट वगैरे माल ठेवला जातो तेथुन सदरचा माल हा ट्रान्सपोर्टच्या वाहनां मधुन डिलर कडे पोहचविला जातो, ट्रान्सपोर्ट करीता मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा लि चे चार इलेक्ट्रिक पिकअप असुन त्या रात्रीचे वेळी माल चलनासह भरुन ठेवलेला असतो त्याचाच फायदा घेउन दि 17/12/2025 रोजी पहाटे 06-40 वा सुमारास अज्ञात चोरट्याने माल भरुन ठेवलेल्या पिकअप चालु करुन गेटवर चलनाची नोंद करुन माल भरलेला इलेक्ट्रीक पिकअप सह 65,98,897/- रु किमतीची सिगारेट व इतर मालाची चोरी केला होता, सदर बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिपक देवदास शिंदे रा लोणीकंद, मगरवस्ती, खेडेकर यांचे खोलीत ता हवेली जि पुणे यांनी फिर्यादी दिली होती त्या वरुन गु र नं 478 /2025 भा न्या संहिता कायदा कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी झालेले असल्याने तसेच औद्यगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटणा देशाच्या आर्थिक प्रगतीस खुप धोकादायक आहेत. परिणामी मा पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंह गिल्ल सो पुणे ग्रामीण यांनी विशेष लक्ष घालुन गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने वेगवेगळ्या टिम नेमुण योग्य त्या सुचना दिल्या, त्यानुसार मा पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एमआयडीसी कडील तपास पथकातिल पोसई अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
तपास चालु असताना चोरट्यांनी चोरी केलेली मुव्हिंग लॉजिस्टिकची पिकअप ही चमडीया गोडाउन पासुन काही अंतरावर सोडुन त्यातुन फक्त 54,53,000/- रु किमतीची सिगारेट घेउन गेलेवे निष्पन्न झाले, सदर चोरी करताना आणखी एका वाहनाचा उपयोग केल्याचे तपासात रांजणगाव पोलीसांना निष्पन्न झाले, त्यानुसार रोडवरिल सुमारे शंभर पेक्षा जास्त सीसीटिव्ही चेक केले. तपास सुरु असताना पोलीस अंमलदार उमेश कुतवळ हे वाघोली परिसरात संशयित वहानाचा शोध घेत असताना त्यांना सदरचे वाहन हे कावेरी हॉटेल वाघोली येथे डिलिव्हरी करत असताना मिळुन आले, त्यानुसार सदर वाहनाचे मालक व सुपरवायझर, चालक यांचे कडे कौशल्य पुर्वक तपास केला असता सुपरवयाझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी नामे दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना सदर वाहन हे चोरी करणे करीता दिल्याची कबुली दिली, त्यावरुन आरोपी नामे 1 ) प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण रा वाघोली ता हवेली जि पुणे यास अटक करण्यात आली. तपासात आरोपी कडुन चोरीस गेलेला मुद्देमाल त्याचप्रमाणे गुन्ह्या वापरलेले वाहन असा एकुण 68,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशन कडील तपास पथकास यश आलेले आहे, इतर दोन आरोपीचा शोध सुरु आहे. यातील दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा पोलीस अभिलेखा वरील आरोपी असुन त्याचे वर शिक्रापुर पोलीस स्टेशन, सिंहगडरोड, लोणीदंक पोलीस स्टेशन येथे चोरीचे एकुण 08 गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

सदरची कामगिरी ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिपसिंह गिल्ल सो, मा श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा श्री प्रशांत ढोले सो, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली श्री महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो काँ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकर पो हवा माणिक काळकुटे, पो काँ अमोल रासकर यांनी केली आहे सदर गुन्हायाचा तपास पोसई अविनाश थोरात हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!