Homeक्राईममतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजा’वर हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजा’वर हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

पुणे महानगरपालिका निवडणूक सन २०२६ अनुषंगाने दिनांक १६.०१.२०२५ रोजी साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे मतमोजणी प्रक्रियेसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त यांनी जाणीवपूर्वक मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणारा मोठा व कर्कश आवाज निर्माण केला, तसेच कर्कश हॉर्न वाजवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारांमुळे मतमोजणी ठिकाणी गोंधळ व तणाव निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.
पोलीस बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत एकूण १९ मोटारसायकल ( त्यामध्ये बुलेट, यामाहा इत्यादी वाहनांचा समावेश आहे ) ताब्यात घेतल्या असून संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई अंतर्गत उल्लंघन करणा-या संबंधितांकडून एकूण रुपये ९६७००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे, कर्कश हॉर्नचा वापर करणे अथवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य करू नये असे याद्वारे पोलीस विभागाकडून तरूणांना आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री.मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-६ डॉ राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर, धिरज शेलार यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!