Homeक्राईमपरिमंडळ ५ मधील बिबवेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पत्नीचा डोक्यात लाकडी दांडक्याने...

परिमंडळ ५ मधील बिबवेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत पत्नीचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खुन केलेल्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

यातील आरोपी गोविंद बाबुराव जगताप व मयत साक्षी गोविंद जगताप पती-पत्नी आहेत. सदर घटना ही दिनांक १०/१२/२०१५ रोजी सांय. १९:३० वाजताच्या सुमारास राठी यांचे प्लॉटमध्ये, वर्धमान लॉन्सचे शेजारी, गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी गोविंद जगताप याचे त्याच्या मामीची बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन आरोपीची पत्नी साक्षी जगताप व आरोपी गोविंद जगताप यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याने कपडे आणण्याचा बहाणा करुन आरोपीने साक्षी हिस राठी यांचे प्लॉटमध्ये, वर्धमान लॉन्सचे शेजारी, गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घेऊन जाऊन तिच्या डोक्यामध्ये लांकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी करुन तिला जिवे ठार मारल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक १६०/२०१५ भा.दं.वि. कलम ३०२, ४०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास श्री. सुनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा.न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. २८१/२०१६ असा आहे.

वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक २९/०३/२०२५ रोजी आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर खटला डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी दत्तक घेतला असून त्यांनी खटल्याच्या निकालासाठी कोर्ट पैरवी यांना विशेष मार्गदर्शन केले आहे.

सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. अनिल कुंभार, कोर्ट पैरवी श्री. संजय जाधव, पोहवा ७७३८ ए.एन. केंगले, मपोहवा ६१३३ मुल्ला, पोहवा एस. व्ही. पुणेकर यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी श्रेणीपोउनि संजय जाधव, पोहवा ७७३८ ए.एन. केंगले, मपोहवा ६१३३ मुल्ला, पोहवा एस. व्ही. पुणेकर व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी वपोनि श्री. सुनिल पाटील, सध्या नेमणूक कासार वडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!