Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट-४ ची कारवाई; गुटखा वाहतूक करणारा इसम जेरबंद, १३.३० लाखांचा...

गुन्हे शाखा युनिट-४ ची कारवाई; गुटखा वाहतूक करणारा इसम जेरबंद, १३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट-४ पुणे शहर !

दिनांक.११/०२/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-४ पुणे शहर मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार युनिट ०४ चे हद्दीमध्ये युनिट – ०४ ची टिम गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करताना स. पो. उपनिरीक्षक प्रविण राजपुत व पोलीस हवालदार सुभाष आव्हाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, साठे वस्ती येथे लेन नं. ८ येथिल कृष्णा मार्ट येथे एक पिवळसर रंगाचा अशोक लेलंड दोस्त टेम्पो क्र एम एच १२/एक्स एम/४८७४ मधुन शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखु यांची वाहतुक करण्यात येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच नमुद पोलीस पथक बातमीच्या अनुषंगाने साठे वस्ती लेन नं. ८ लोहगांव पुणे येथे कृष्णा मार्ट चे जवळ सापळा रचुन थांबलो. त्यानंतर १६/०५ वा. बातमीप्रमाणे अशोक लेलंड दोस्त टेम्पो क्र एम एच १२ / एक्स एम /४८७४ पिवळसर रंगाचा टेम्पो येताना दिसल्याने त्यास युनिट -०४ चे पथकाने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नगाराम देवाराम जाट वय ३१ वर्षे, रा. ड्रिम स्क्वेअर सोसायटी, फ्लॅट नं. ८/१/१, वडगांव शिंदे रोड, लोहगांव पुणे, मुळ पत्ता गांव – करंडवा, तहसिल – देसुरी, जि. पाली, राजस्थान असे असल्याचे सांगितले. त्याचे टेम्पोमध्ये एकुण ६,३०,९६०/- रुपये किंमतीचा विमल कंपनीचा शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखु मिळुन आला तसेच सदरचा टेम्पो किंमत रुपये ७,००,०००/- असा एकुण १३,३०,९६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदर इसमावर लोहगाव पोलीस ठाणे येथे भा. न्या. सं.का. क. १२३, २२३, २७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण याचे विनियमन) अधिनियम सन क. ७ ( २ ), २० (ब), अन्न सुरक्षा आणि मानके अधि. क. २६(i) (iv) गुन्हा दाखल करणेत आला.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कांचन जाधव, युनिट- ४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रविण राजपुत, पोलीस अंमलदार प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, शरद झांजरे, मयुरी नलावडे व रोहीणी पांढरकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!