Homeक्राईमखडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन (०२) गावठी पिस्टलसह...

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन (०२) गावठी पिस्टलसह खडक पोलीसांनी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खडक पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत. खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सक्त सूचना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, श्री. शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत. दिनांक २३/०९/२०२५ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार २८४२ हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे अथर्व ऊर्फ आप्पा सणस, याचेकडे पिस्टल असुन तो शितळा देवी चौक येथे नवीन बांधकाम चालु असलेल्या इमारतीच्या समोर पुणे याठिकाणी उभा आहे, अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उप-निरीक्षक श्री. महेंद्र कांबळे यांना कळविले असता त्यांनी ती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे यांना कळविले असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे सह-प्रभारी पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम,पो.हवा. फरांदे, पो.शि. दिवटे, पो.शि. चंदेल, पो.शि. शेख असे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे अथर्व सणस हा शितळा देवी चौक येथे नवीन बांधकाम चालु असलेल्या इमारतीच्या समोर याठिकाणी उभे असलेले दिसले त्यांची व स्टाफची नजरानजर होताच ते त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यांना स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्यांना शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस, वय-२३ वर्षे, धंदा – भाजीपाला विक्री, रा. ३३/३६ गुरुवार पेठ, शितळा देवी चौक पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अर्थव सणस याचे पँन्टमध्ये कंबरेस डाव्या बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पँटचे मागील डाव्या खिशात ०२ जिवंत राऊंड मिळुन आले. तसेच त्याकडे आणखी विचारणा केली असता त्याने आणखी एक गावठी पिस्टल असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर दुसरी पिस्टल कुठे आहे असे विचारले असता शेजारच्या वाड्यामध्ये विटांच्या ठिगाऱ्या खाली लपवुन ठेवले आहे असे सांगितले. तेथून एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे. त्याचेकडील दोन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची प्रत्येकी किंमत ५०,०००/- रूपये व ०२ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये २,०००/- किंमतीचा असा एकूण १,०२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास दिनांक २४/०९/२०२५ रोजी ०० /३० वा. अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. महेंद्र कांबळे हे करीत आहे.

नमूद अटक आरोपी यांचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत. १)खडकपोलीसठाणेगु.र.नं. १४५/२०२५ बी. एन. एस. कलम ११८ (२), ११५ (२),३५१(१),३५२,१८९(४),१९१(२).१९१(३).१९०, आर्म अॅक्ट ४(२५), मपोका कलम ३७ ( १ ) सह १३५.

नमूद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह – आयुक्त, श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. कृषीकेश रावले पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनघा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, अजित फरांदे, किरण ठवरे, निलेश दिवटे, योगेश चंदेल, शोएब शेख, मयूर काळे, विकास पांडोळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे, यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!