संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
- दि.27/04/2025 रोजी पोलीस अंमलदार गणेश सुभाष चिंचकर, लवेश शिंदे, अभिजीत जाधव असे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोअंम / चिंचकर यांना त्यांचे खाजगी बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, काकडेनगर काकडेनगर येथे ट्रॅव्हल्स पार्क केलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये कोणीतरी एक अज्ञात इसम त्यांचेकडील लाल रंगाचा टेम्पो क्र. एमएच 12 एसके / 9702 मध्ये चार पांढऱ्या पॉलीथीन पिशव्यामधुन गुटख्यासारखा पदार्थ ठेवत आहे. त्याअनुषंगाने सदरबाबत मा. पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रऊफ शेख यांना कळविल्याने त्यांनी ताब्यात घेवुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणला. सदरबाबत दि. 29/04/2025 रोजी फुड अॅण्ड ड्रग्ज विभागाकडील अधिकारी यांचेकरवी खात्री करुन सदरचा रजनीगंधा नावाचा पानमसाला हा प्रतिबंधीत असलेला माल असल्याने सदरबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 34/2025 बीएनएस 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27 (3) (e), 30 (2) (a), 59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो. मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो. श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त साो., परिमंडळ – ५ डॉ. श्री राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो., वानवडी विभाग श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री अब्दुल रौफ शेख, श्री नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार लवेश शिंदे, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, संतोष बनसुडे, विकास मरगळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























