Homeक्राईमकाळेपडळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी अवघ्या ०२ तासात खुनाच्या आरोपीस ठोकल्या बेडया.

काळेपडळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी अवघ्या ०२ तासात खुनाच्या आरोपीस ठोकल्या बेडया.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस हद्दीत दिनांक ०२/०८/२०२५ रोजी पहाटे ०४/५२ वाजता कॉलर/इसम नामे किसन राजमंगल सहा वय२० वर्षे, रा. अजगारवा पोस्ट पकडीदल जिल्हा मोतीहारी, राज्य बिहार याने पुणे पोलीस कंट्रोल रूम येथे पहाटे डायल ११२ संपर्क करुन कळविले की, त्यांचा मित्र नामे रविकुमार शिवशंकर यादव यास चार अनोळखी इसमांनी मोटार सायकल वरुन येवुन, त्यांचे दुकानातुन बेडसिट व गादी दिली नाही या कारणावरुन डोक्यात लोखंडी पहार मारुन गंभीर जखमी करुन, निघुन गेले आहेत. असा कॉल प्राप्त झाल्याने, काळेपडळ पोलीस ठाणे कडील महमंदवाडी बीट मार्शल व रात्रगस्त अधिकारी यानी घटनास्थळ उंड्री- हांडेवाडी रोड, साईगंगा सोसायटीच्या समोर, पत्र्यांचे शेडमध्ये जावुन पाहणी केली असता, रविकुमार शिवशंकर यादव वय ३३ वर्षे, हा रक्तांच्या थारोळ्यात पडलेला होता. सपोनि सुतार यांनी लागलीच १०८ अॅम्बुलन्स बोलावुन, डॉक्टरांनी जखमी पडलेल्या इसमाची तपासणी करुन, त्यास मयत घोषीत केले.
सदर कॉलर यास घडलेल्या घटनेविषयी वारंवार विचारपुस केली असता, त्यांच्या सांगण्यामध्ये विसंगती दिसुन आली व आजुबाजुकडील सीसीटिव्ही फुटेज पाहणी करता, सदर घटनास्थळावर मोटार सायकल वरुन आलेल्या अनोळखी चार इसमांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसु येत नव्हती. त्यामुळे पोलीसांची संशयाची सुई ही कॉलर यांचकडे फिरत होती. कॉलर हा त्याचे स्टेटमेंट वारवार बदलत होता. आजुबाजुस राहत असलेल्या लोकांकडे चौकशी करता कॉलर व मयत यांचेमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली. कॉलर हा सदर घटनेबाबत बनाव करत असल्याचे संशय आल्याने, काळेपडळ पोलीसांनी त्यांचा पोलीसी खाक्या दाखविला असता, कॉलर किसन राजमंगल सहा याने त्यांचा मित्र रविशंकरकुमार शिवशंकर यादव यांचेसोबत रात्री दारु पित असताना मयत इसम याने कॉलर याला विनाकारण आई बहिणीवरुन वाईट शिवीगाळ करुन, मारहाण केली. व यापुर्वी सुध्दा मयत यांनी कॉलर आरोपीस वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचा राग मनात धरुन मयत दारु पिवुन झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करुन खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी विरुध्द काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक ३०२ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करुण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा तपास सपोनि रत्नदीप गायकवाड करत आहे.

सदरची कारवाई ही राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व मानसिंग पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली रात्रगस्त अधिकारी सपोनि विलास सुतार, रत्नदिप गायकवाड, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोउनि अनिल निंबाळकर, पोलीस हवा प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंथरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे या विशेष पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!