Homeक्राईमलोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या ३ तासांमध्ये खुना सारखा गंभिर गुन्हा उघडकीस आणुन...

लोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या ३ तासांमध्ये खुना सारखा गंभिर गुन्हा उघडकीस आणुन आरोपी ताब्यात घेतलेबाबत.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

दि. ०१/०४/२०२५ रोजी सकाळी ०७/३० वा. चे सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर यांचे मार्फत रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर, पुणे याठिकाणी एक इसम जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असलेबाबत कॉल प्राप्त झाला. सदर कॉल चे पुर्ततेकामी लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
सदर घटनास्थळी इसम नामे रविंद्र काशीनाथ काळभोर वय ४५ वर्षे रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर हा त्याचे राहतेघराचे बाहेर पलंगावर रक्ताचे थारोळयात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असल्याचे पोलीसांना दिसुन आले. तदनंतर लोणी काळभोर पोलीसांनी लागलीच आय कार, डॉग स्कॉड व अॅम्ब्युलन्स ला पाचारण केले व अॅम्ब्युलन्सव्दारे जखमी इसमास प्राथमिक आरोग्यकेंद्र लोणी काळभोर पुणे येथे नेले. परंतु सदर इसम उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्यावरुन सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात कारणावरुन खुन केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना प्राप्त झाली.
तदनंतर श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे लोणी काळभोर पो. स्टे. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणचे आजबाजुचे परिसरातील लोकांकडे परिस्थीतीजन्य पुराव्यांचे आधारे चौकशी करुन माहिती घेतली. त्यावर मयत इसमाची पत्नी शोभा रविंद्र काळभोर वय ४२ वर्षे यांचे इसम नामे गोरख त्र्यंबक काळभोर वय ४१ वर्षे यांचेशी अनैतीक संबध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन लोणी काळभोर पोलीसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, चौकशीदरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर व मयताची पत्नी शोभा रविंद्र काळभोर या दोघांनी आपसांत संगणमत करुन त्यांचे अनैतीक संबंधात मयत इसम बाधा निर्माण करत असल्याने, मयत इसम हा दि. ३१/०३/२०२५ रोजी रात्री ११/०० वा. चे नंतर त्याचे राहते घराचे बाहेर झोपला असताना त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार करुन, गंभिर जखमी करुन, त्यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर घटनेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस आज रोजी गु.र.नं. १५१ / २०२५ बी. एन. एस. क. १०३, ३(५) महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन दाखल गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेणेत आले आहे.
सदर गुन्हयाचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ठ स्वरुपाचा असताना देखील अवघ्या ३ तासांचे आतमध्ये आरोपी निष्पन्न करुन, लोणी काळभोर पोलीसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच आरोपीतांना ताब्यात घेतले असुन अटकेची कार्यवाही सुरु आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगीरी श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर व श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे लोणी काळभोर पो. स्टे. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक उदय काळभोर, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पो. हवा. देवीकर, शिंदे, वणवे, नागलोत, मेमाणे, पो. शि. विर, शिरगीरे, कर्डीले, गाडे, कुंभार, सोनवणे, बनकर, जोजारे, धुमाळ, महिला पोलीस हवा. नवले, होले, म.पो.शि. उषा थोरात यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!