Homeक्राईमवारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची कामगीरी आरोपीकडून...

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची कामगीरी आरोपीकडून ०५ मोटारसायकल जप्त करुन ०३ गुन्हे केले उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे शहर *

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

दिनांक २५/०३/२०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर चे हद्दीमध्ये वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी संजय नरळे, पोलीस उप-निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोशि/८७६१, चित्ते, पोशि/ १०३१५ शिंदे पोशि/ १०५३० पोळ, पोशि/ १०३२० कुंभार, पोशि/ ९०५६ काटे, पोशि/ ३५९२ तांगडे, असे वाहनचोरीचे अनुषंगाने वारजे भागात १५.०० वा. चे सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित् व गणेश शिंदे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम ग्रे रंगाची होंडा कंपनीची अक्टीव्हा ही गाडी बनावट नंबर प्लेट MH 12 KK 7888 ही लावून गाडी वापरत आहे. तो सद्या म्हाडा वसाहतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रोझरी शाळेजवळ असल्याची माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती त्यांनी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांना कळविली असता त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांना कळविली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करणेबाबत तोंडी आदेश दिले.
त्यानंतर आम्ही वर नमुद पोलीस स्टाफ सदर इसमाचा शोध घेता म्हाडा वसाहत, वारजे, पुणे या भागात शोध घेता एक इसम ग्रे रंगाची होंडा कंपनीची अक्टीव्हा ही गाडी बनावट नंबर प्लेट MH 12 KK 7888 या गाडीसह मिळून आला. त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रविंद्र नामदेव गायकवाड, वय ५७ वर्षे, रा. स.नं.१२०/४०, गणपतीनगर, गणेशमळा, सिंहगड रोड, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यात मिळून आलेली मोपेडचे कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याचेवर आम्हास संशय आल्याने आम्ही मुद इसमास त्याचे ताब्यात मिळाले मोपेडसह वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे घेवून येवून त्यास विश्वासात घेवून तपास करता त्याने सदरची मोपेड ही ६ ते ७ महिन्यांपुर्वी वारजे ब्रिजखालून चोरी करून तीचा वापर करत असल्याचे सांगीतले. सदर मोपेडबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथील अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोपेडबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १२३ / २०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजून आले.
त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने यापुर्वी पर्वती या भागातून अजून काही गाड्या चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर तसा पंचानामा करुन त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या एकुण ०५ मोटारसायकल जप्त करण्यात येवून एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच २ वाहनाबाबत तपास करीत आहोत. दाखल गुन्ह्यातील आरोपीस दि. २५/०३/२०२५ रोजी १७.०० वा. अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास संजिव कळंबे, पोलीस हवालदार / ७०२५, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, मा. श्री भाऊसाहेब पटारे, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा. श्री निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांचे देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोहवा / ७०२५ कळंबे पोलीस अंमलदार पोशि/ ८७६१, चित्ते, पोशि/ १०३१५ शिंदे पोशि/ १०५३० पोळ, पोशि/ १०३२० कुंभार, पोशि/ ९०५६ काटे, पोशि/३५९२ तांगडे, पोशि/ १०४५५ कपाटे, पोशि/ ५८५१ जाधव, पोशि/ २४४५ शेलार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

error: Content is protected !!