मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !
कोंढवा पोलीस स्टेशन कडील अट्टल गुन्हेगार नामे जयेश महादेव बांगर यास आज दि.०१/०८/२०२६ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यानुसार छत्रपती संभाजीनगर कारागृह येथे ०१ (एक) वर्षाकरीता स्थानबध्द केले असुन तो मागील ०७महिन्यापासुन पोलीसांना गुंगारा देत असुन त्यास अत्यंत कौशल्यप्राय प्रयत्नातुन पकडुन त्याचे विरुध्द एमपीडीए कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, गोर गरीब नागरीकांना हत्याराच्या धाक दाखवुन लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असुन ते मा. न्यायालयात प्रलंबीत आहेत.
जयेश महादेव बांगर याचा गुन्हेगारी अभिलेखाचा बारकाईने अभ्यास करुन व आवश्यक ते कागदपत्रांची मांडणी करुन त्याचा प्रस्ताव गृह विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठवुन योग्य मान्यता घेवुन त्यास मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांचे आदेशाने छत्रपती संभाजीनगर, कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे मागील एका महिन्यात ०३ एम.पी.डी.ए. व ०१ मोक्का कायद्यान्वये कारवाई कोंढवा पोलीस स्टेशन कडून करण्यात आली आहे. याचप्रमाणे इतर गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवुन भविष्यात ही याचप्रमाणे कठोर कारवाई कोंढवा पोलीस स्टेशन करणार आहे.
वरील कामगिरी श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, परि-५, पुणे. श्री. रामदास इंगवल, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत मंडले, पोलीस उप निरीक्षक रविंद्र गावडे, सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, पो.अं. गिरीधर एकोर्गे, पो.अं. नितीन चव्हाण, पो.अं. सागर माने व पो.अं. रशिद शेख यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























