Homeक्राईमघरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

स्वारंगी हाईट्स, टिळेकरनगर, कोंढवा बु, पुणे येथे रहिवासी यातील फिर्यादी हे त्याच्या कुटुंबीयासह कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले असताना अज्ञात तीन इसमांनी त्याच्या घराचा कडी कोयंडा उचकटुन घरफोडी चोरी करुन ४,७०,०००/-रु. कि ऐवज चोरी करुन नेल्याबाबत कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.८४/२०२६ भा.न्या.सं.क. ३३१ (३),३३१ (४),३०५,३(५) अन्वये गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दिपक कारंडे यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक आकाश विटे व त्यांचे पथक आरोपी यांचा सी.सी.टि.व्हि. फुटेजच्या माध्यमातुन तसेच गुप्त बातमीदारामार्फतीने शोध घेत होतो. पुणे शहरात यापुर्वी अश्याप्रकारे गुन्हे करणा-य आरोपीचा अभिलेख प्राप्त करुन त्यामधुन आरोपीचे वर्गीकरण प्राप्त करुन शोध घेत असताना नमुद गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, वय २१ वर्षे, रा. गाडीतळ हडपसर पुणे याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले होते. सदर आरोपी हा चाणक्ष बुध्दीचा असुन तो पोलीसांना सापड्डु नये म्हणुन मोबाईल वापरत नव्हता. तसेच तो नेहमी पेहराव बदलुन चेहरा लपवुन राहत असे त्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड होते. नमुद आरोपी याचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करुन माहिती प्राप्त केली असता सदर आरोपी हा दि.१७.०७.२०२६ रोजी गोकुळनगर ग.न.०३, येथील शिवतेज गणपती मंदिराच्या जवळ २०.०० वा ते २२.०० वा सुमारास कोणास तरी भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विजय खेंगरे यांना प्राप्त झाली होती. सदर माहिती वरुन नमुद भागात तपास पथकाच्या टिम तयार करुन आरोपी येणा-या भागात रोडच्या लगत पार्क होणा-या गाडयामध्ये सापळा रचुन थांबले असता आरोपी २१.०० वा सुमारास पेहराव बदलुन तोडाला मास्क लावुन पॅशेजर रिक्षाने मेन रोडला उतरुन गोकुळनगर लेन नं.०३ मध्ये येत असताना दिसताच त्यांच्यावर झडप टाकुन पकडण्याचा प्रयत्न केला असता तो धक्का देवुन २ किलो मिटर पर्यत पळुन जावुन गर्दीमधील चालु बाधंकामाच्या बिल्डींगमध्ये जावुन लपवुन बसला. तेव्हा पूर्ण बिल्डींगचा सर्च घेवुन त्यास पकडण्याकामी गेलो असता त्याने बिल्डींग वरुन पुन्हा उडी मारुन पळुन जावु लागला असता त्यास पकडुन त्याचे नाव  पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, वय २१ वर्षे, रा. हडपसर पुणे असे सांगितले. त्याच्याकडे घरफोडी चोरीबाबत तपास केला असता त्याने त्याचे साथीदारासह स्वारंगी हाईट्स, टिळेकरनगर, कोंढवा बु, पुणे येथे घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वाघजाई अपार्टमेंन्ट फलॅट नं.२०१, वाघजाई मंदिराजवळ, सोपानकाकानगर कात्रज पुणे येथे घरफोडी चोरी केल्याचा, तसेच अकृती हपटाऊन कंट्री उड्स टिळेकरनगर येथे यामहा कंपनीची मॉडेल MT 15 V2 (BXF1) मोटार सायकल चोरी केल्याचा तसेच हडपसर पोलीस स्टेशन येथे शरिरा विरुध्दचा गुन्हा करुन फरार असल्याचे निष्पन्न करुन त्याच्याकडुन २ घरफोडीचा १ वाहन चोरीचा व १ शरिराविरुध्दच्या गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपीकडुन एकुण २,९०,०००/-रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी याच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.

१) कोंढवा बुगा येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ८४/२०२६, भा.न्या.सं.क.३३१ (३), ३३१ (४),३०५.

२) कोंढवा बुगा येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १०४/२०२६, भा.न्या.सं.क ३०३(२).

३) हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ४५७/२०२६ भा.न्या.सं.क. ११८ (२) व इतर.

४) भारती विदयापीठ पोलीस ठाणे पुणे येथे दाखल गु.र.नं. ३६५/२०२६, भा.न्या.सं.क ३३१(३),३३१ (४), ३०५.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ.०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक व कोंढवा बुगा, येवलेवाडी पो.स्टे. पुणे शहर श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. दिपक कारंडे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी आकाश विटे, पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयुर मोरे व सुजित मदन यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!