मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील शरीराविरूध्द गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नामे अमन अंबिर झारेकरी, वय २२ वर्षे पत्ताः रुम नं. २०२, महालक्ष्मी बिल्डींग, स.नं. १३२, दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे याचेविरूध्द पुणे शहरात पर्वती व सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे एकुण ०६ गुन्हे दाखल असुन त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करून देखिल त्याने गुन्हे केले आहेत. त्याची सिंहगड रोड परिसरामध्ये दहशत असुन तो बेकायदेशीर जमाव जमवुन घातक हत्यार जवळ बाळगुण खुन करण्याचा प्रयत्न करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, घातक हत्यार जवळ बाळगुण दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, अग्निशस्त्र जवळ बाळगणे व बेकायदशीर जमाव जमवुन घातक हत्यार जवळ बाळगुण दुखापत, तोडफोड करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करणे असे कृत्य करणे, बेकायदेशिर जमाव जमविणे व त्यास चिथवून लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आदेशांचा भंग करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार करीत असे
. मा. श्री. अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे सो.. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. राजेश बनसोडे साो., अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. डॉ. सागर कवडे, पोलीस उप आयुक्त, परि. ३, पुणे, श्री. विजय कुंभार साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड, पोलीस स्टेशन पुणे व श्री. समीर गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार सिंहगड रोड पोलिस स्टेशनकडील सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी पोउपनि संतोष भांडवलकर यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे पो. हवालदार ७७३१ पंकज देशमुख, पो. अंमलदार ९०३८ अरविंद धावडे यांनी सबळ पुरावे गोळा करून महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृक्रश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, सन १९८१ (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन ५५) (दुरूस्ती १९९६, दुरूस्ती २००९, दुरूस्ती २०१५, दुरुस्ती २०२५) कलम ३ (१) प्रमाणे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयामध्ये सादर केला असता मा. पोलिस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्र. गुन्हे/पीसीबी/डीईटी/सिंहगडरोड/झारेकरी /३९१/२०२६ व गुन्हे/पीसीबी/डीईटी/सिंहगडरोड / झारेकरी/३९२/२०२६ दि.१०/०६/२०२६ अन्वये त्यास ०१ (एक) वर्षाकरिता नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचा आदेश पारित केला असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे रवानगी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























